धाराशिव : फिर्यादी नामे- स्वप्नील रावसाहेब कनगरे, वय 22 वर्षे, रा. अशोक नगर, ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर सोबत त्यांचे भाउ हे दोघे केशेगाव येथुन पिकअप क्र एमएच 17 बीवाय 5196 ने श्रीरामपुरकडे जात असताना अमर पॅलेस येथील सर्व्हीस रोडने उड्डान पुलाकडे जात असलेल्या रोडवर धाराशिव येथे अनोळखी तीन ते चार लोकांनी पिकअपला रिक्षा व मोटर सायकल आडवी लावून मारहाण करुन रोख रक्कम 10,000₹ व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकुण 14, 000₹ किंमतीचा मुद्देमाल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- स्वप्नील कनगरे यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : फिर्यादी नामे- सुहास महादेव शेळके, वय 51 वर्षे, रा. आंबेडकरनगर मुतखन्ना गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप संशयीत आरोपी नामे- नागेश अण्णाप्पा चारे रा. बेळंब ह.मु. नाईकनगर यांनी दि.03.11.2023 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील विवो कंपनीचा एक मोबाईल, ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल व रोख रक्कम 500 ₹ असा एकुण 21,500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुहास शेळके यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मुरुम पोलीस ठाण्याचे पथकाने सुहास शेळके यांनी पोलीस ठाणे मुरुम येथे दिलेल्या माहिती वरुन पोलीस ठाणे मुरुम यांनी लागलीच संशयीत आरोपी नामे -1) नागेश अण्णाप्पा चारे रा. बेळंब ह.मु. नाईकनगर यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर मुरुम पोलीसांनी नमुद आरोपी सह चोरीस गेलेला माल हस्तगत केला असुन गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे- श्रीकांत भास्कर माकोडे, वय 30 वर्षे, रा. शिराढोण, ता. कळंब जि. धाराशिव यांचे शिराढोण शिवारातील शेत गट नं 114 मधील कॉपर केबल, स्टार्टर, ऑटो, चार्जिंग फवारा, कप्पी साहित्य व 3 किटकॅट असा एकुण 22,400 ₹ किंमतीचे साहित्य हे दि.01.11.2023 रोजी 20.00 ते दि. 02.11.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- श्रीकांत माकोडे यांनी दि.03.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.