उमरगा – पाचट गोळा करण्याच्या वादातून युवकाला लाथाबुक्क्यांनी आणि दगड-काठ्यांनी मारहाण करत जखमी केल्याची घटना उमरगा तालुक्यातील माडज शिवारात घडली. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अर्जुन बाबू मारेकर (वय 36, रा. माडज, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी धनराज भानुदास मारेकर (रा. माडज, ता. उमरगा) याने दिनांक 9 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पाचट गोळा करण्याच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर, आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच काठी व दगडाने मारहाण केली आणि गंभीर जखमी केले. तसेच, त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर, फिर्यादी अर्जुन मारेकर यांनी 10 मार्च 2025 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
परंडा पोलीस ठाण्यासमोर मद्यधुंद अवस्थेत गोंधळ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
परंडा – परंडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मद्यधुंद अवस्थेत आरडा-ओरड करून गोंधळ घालणाऱ्या युवकावर परंडा पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मोहन सोनवणे (वय 29, रा. भीमनगर, धाराशिव, ह.मु. फुरसुंगी, पुणे) हा दिनांक 10 मार्च 2025 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या परिसरात मद्यधुंद अवस्थेत मोठ्या आवाजात आरडा-ओरड करत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110/117 अन्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.