धाराशिव : शहरातील सुलतानपुरा येथे राहणारे निवृत्ती लक्ष्मण कोळी (वय ७५) यांच्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया कोर्ट शाखेत एटीएम बदलून ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान निवृत्ती कोळी हे बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी दोन ते तीन अनोळखी इसमांनी त्यांचे एटीएमचा पिन मिळवून त्यांची नजर चुकवत बनावट एटीएम कार्ड देवून त्यांच्या मूळ एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ४०,००० रुपये काढण्यात आले.
या फसवणुकीची तक्रार त्यांनी दि. १३ मार्च २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून भादंवि कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.