• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव येथे मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

पोलिसांची मोठी कारवाई

admin by admin
March 16, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावत मोटारसायकल चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला अटक केली आहे. सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 272/2024 कलम 394 मधील पाहिजे आरोपी वडजी रोडवरील फटाक्याच्या कारखान्याजवळ थांबलेला आहे. मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

चोरीच्या मोटारसायकली जप्त
आरोपीकडे चौकशी केली असता, त्याने धाराशिव शहरातून मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. त्याच्या आणखी चौकशीत, त्याने आणि त्याचा साथीदार कुक्या उर्फ मोतीराम बादल शिंदे यांनी मिळून अनेक मोटारसायकली चोरून त्या मोहामध्ये एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पाच मोटारसायकली तसेच दोन डिझेल कॅन्स जप्त केले.

चोरीचे गुन्हे आणि पुढील कारवाई
तपासादरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींबाबत खालील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याचे आढळले:

  • आनंदनगर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 100/2025 (कलम 303(2)), 276/2020 (कलम 379)
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 57/2025 (कलम 3303(2)), 83/2025 (कलम 303(2))
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 73/2023 (कलम 379)
  • येरमाळा पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 40/2025 (कलम 303(2))
  • गातेगाव, लातूर पोलीस ठाणे: गुन्हा क्र. 23/2025 (कलम 303(2))

एकूण 1,61,510 रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करून आरोपीला आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक महेबुब अरब, पोलीस अंमलदार विनायक दहीहंडे, प्रकाश बोईनवाड आणि सुनिल मोरे यांच्या पथकाने केली.या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

Previous Post

धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात सहा पोलिसांचे पथक तैनात

Next Post

लोहारा : पतीच्या छळास कंटाळून आई-मुलीची आत्महत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

लोहारा : पतीच्या छळास कंटाळून आई-मुलीची आत्महत्या

ताज्या बातम्या

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026

Recent Posts

  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!