• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा : प्रेमप्रकरणातून तरुणाचा मृत्यू : चार आरोपी अटकेत, सात फरार

admin by admin
March 16, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
परंडा : प्रेमप्रकरणातून तरुणाचा मृत्यू : चार आरोपी अटकेत, सात फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे प्रेमसंबंधाच्या कारणावरून १८ वर्षीय तरुणावर अमानुष मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, सात जण अद्याप फरार आहेत.

काय आहे प्रकरण?

भूम तालुक्यातील दुधोडी गावातील माऊली बाबासाहेब गिरी (१८) याचे परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथील एका विवाहित महिलेच्या सोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे नाते मुलगी वडाचीवाडी येथे मामाकडे शिक्षणासाठी असताना शाळेत जुळले होते. लग्नानंतरही त्यांचा संपर्क सुरूच राहिला.

३ मार्च रोजी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे दोघांमध्ये भेटण्यासंदर्भात संवाद झाला. हा संवाद मुलीच्या पतीच्या हाती लागला. त्याने तिचा मोबाईल ताब्यात घेत माऊली गिरी याला भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. माऊली गिरी आल्यानंतर त्याला घरात कोंडून, मुलीच्या पतीसह तिचे वडील आणि इतर चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला पांढरेवाडी गावालगतच्या रस्त्यावर फेकून दिले.

या घटनेची माहिती केळेवाडीचे पोलीस पाटील यांनी माऊली गिरी याचे वडील बाबासाहेब गिरी यांना दिली. त्यांनी तातडीने जखमी मुलाला जामखेड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. १४ दिवस उपचार सुरू असताना किडनी आणि शरीराच्या इतर भागांवर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे रविवारी सकाळी १०.३० वाजता माऊली गिरी याने शेवटचा श्वास घेतला.

चार आरोपी अटकेत, सात जण फरार

या घटनेबाबत बाबासाहेब गिरी यांनी अंबी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सतीश जगताप (रा. पांढरेवाडी), राहुल मोहिते (रा. पांढरेवाडी, परंडा), आकाश मगर (रा. शेळगाव, परंडा) आणि विजय पाटील (रा. सोनारी, परंडा) यांना अटक केली आहे.  इतर सात आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्ष खरड आणि पीएसआय ज्ञानेश्वर घाटगे करत आहेत. पोलिसांनी आता ही केस खूनप्रकरण म्हणून तपासायला सुरुवात केली असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पहिल्या मुलाची आत्महत्या, दुसऱ्याची हत्या

 दोन वर्षांपूर्वीच बाबासाहेब गिरी यांच्या मोठ्या मुलाने आत्महत्या केली होती. बाबासाहेब गिरी यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून, दुधडी गावकऱ्यांनी वर्गणी करून माऊली गिरी यांच्या उपचारासाठी पैसे पाठवले होते. परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरील घटनेचा तपास करून सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

हेही वाचा , क्लिक करा …परंड्यातील प्रेम प्रकरण : स्वतःला न्यायाधीश समजणाऱ्यांचा आतंक …

Previous Post

गोवंशीय जनावरांची निर्दय वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

परंड्यातील प्रेम प्रकरण : स्वतःला न्यायाधीश समजणाऱ्यांचा आतंक …

Next Post
परंडा : प्रेमप्रकरणातून तरुणाचा मृत्यू : चार आरोपी अटकेत, सात फरार

परंड्यातील प्रेम प्रकरण : स्वतःला न्यायाधीश समजणाऱ्यांचा आतंक ...

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!