तुळजापूर तालुक्यातील गंधोरा येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी 14 जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 16 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता रामराव तांडा गंधोरा शिवारातील गट नं. 55 मध्ये शेतीच्या वादातून हाणामारीची घटना घडली. फिर्यादी विमल पंडीत राठोड (वय 65 वर्षे, रा. रामराव नगर तांडा, गंधोरा, ता. तुळजापूर) यांना आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कुर्हाडीने आणि लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली.
या घटनेत दयानंद सतिष भोसले (पाटील), लक्ष्मण नागनाथ भोसले (पाटील), प्रविण उर्फ बाळू नागनाथ भोसले (पाटील), सतिष शहाजी भोसले (पाटील), नवनाथ शहाजी भोसले (पाटील), प्रशांत नागनाथ भोसले (पाटील), नागनाथ शहाजी भोसले (पाटील), पुनम दयानंद भोसले (पाटील), मनिषा लक्ष्मण भोसले (पाटील), ज्ञानु हणमंत जाधव, कल्याण हणमंत जाधव, संतोष धनाजी मुसळे, संभाजी श्रीपत भोसले (पाटील), प्रशांत नागनाथ भोसले (पाटील) आणि इतर एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमल राठोड यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात दि. 21 मार्च 2025 रोजी भारतीय दंड संहिता कलम 109, 189(2), 191(2), 191(3), 190, 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनसुर्डामध्ये मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बेंबळी – अनसुर्डा गावात एका तरुणाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बेंबळी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुभम माउली साळुंखे (वय २१), करण माउली साळुंखे, ऋषीकेश अरुण भोसले (वय २३) आणि आत्माराम ज्ञानदेव भोसले (वय २२, सर्व रा. अनसुर्डा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर महादेव जमदाडे (वय २४, रा. अनसुर्डा) याने पोलिसांत तक्रार दिली की, १९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता या आरोपींनी त्याला गावाजवळील कॅनलवर बोलावून घेतले. तिथे विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्या, काठी आणि दगडाने मारहाण केली. तसेच, जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
जमदाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भा.द.ं.सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.