कळंब -तालुक्यातील नागुलगाव येथे किरकोळ वादातून दोन गटांमध्येदोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही गटांनी शिराढोण पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, दोन्ही गटातील लोकांविरुद्ध नोंदवण्यात आले आहेत
पहिला गट:
पहिल्या घटनेत फिर्यादी अतुल पंडीत काळे (वय 38 वर्षे, रा. नागुलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 21 मार्च 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता नागुलगाव येथे संजय विष्णु कांबळे, धिरज संजय कांबळे, सुरज संजय कांबळे (सर्व रा. नागुलगाव) यांनी मोटरसायकल पायावरून गेल्याचे कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून अतुल काळे यांना गंभीर जखमी केले.
फिर्यादीच्या पत्नी आशा, भावजई निर्मला आणि भावाची मुलगी राणी यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा गट:
दुसऱ्या घटनेत फिर्यादी संजय विष्णु कांबळे (वय 48 वर्षे, रा. नागुलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यावर अतुल पंडीत काळे, अजय अतुल काळे आणि यश अतुल काळे यांनी मोटरसायकल पायावरून गेल्याचे कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.
या प्रसंगी फिर्यादीची पत्नी मिरा आणि मुले धिरज व सुरज यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(1), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यामुळे पोलीस तपास करत आहेत. या घटनेने नागुलगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास शिराढोण पोलीस करीत आहेत.