• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धोकादायक वर्गखोल्या व वीज बिलासाठी निधीची तरतूद करावी

आमदार कैलास पाटील यांची सभागृहात मागणी

admin by admin
March 24, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्यातील धोकादायक वर्गखोल्या आणि शाळेतील वीज बिल भरण्यासाठी निधीची कमतरता असल्याची समस्या आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात मांडली. त्यांनी या मुद्द्यावर आवाज उठवत स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी केली. या मागणीला प्रतिसाद देत शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन दिले.

आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, जिल्हा परिषदेचा सेस आणि जिल्हा नियोजन समितीमधून पाच टक्के निधी देण्याची तरतूद असली तरी ती अपुरी पडत आहे. धाराशिव जिल्ह्यात सध्या ५९४ धोकादायक वर्गखोल्या आहेत. मात्र, नियोजन समितीच्या पाच टक्के निधीतून केवळ ८२ वर्गखोल्यांचेच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित ५१४ वर्गखोल्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, समग्र शिक्षण योजनेतूनही ही कामे केली जातील असे सांगण्यात आले होते, परंतु अद्याप त्याचा कोणताही ठोस परिणाम दिसून आलेला नाही. शाळांमध्ये ई-लर्निंगची सुविधा असूनही वीजबिल व्यावसायिक दराने आकारले जात आहे, हे अन्यायकारक आहे. वीजबिलासाठी सवलतीच्या दराने आकारणी करण्यात यावी आणि या खर्चासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

या मागणीवर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोईर यांनी उत्तर देताना सांगितले की, धोकादायक वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि, सध्याचा निधी अपुरा असल्याची कबुली त्यांनी दिली. धोकादायक वर्गखोल्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच, वीजबिलासाठी व्यावसायिक दर लागू न करता सवलतीच्या दराने आकारणी करण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धोकादायक वर्गखोल्या आणि वीज बिलासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार कैलास पाटील यांनी आवाज उठवल्याने शिक्षण क्षेत्रातील समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या आहेत. सरकारकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.

Previous Post

धाराशिव : अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा – कंत्राटदारांचा लुटमारीचा डाव

Next Post

कुणाल कामरा – विनोदाचा मुखवटा की वैयक्तिक हल्ला?

Next Post
कुणाल कामरा – विनोदाचा मुखवटा की वैयक्तिक हल्ला?

कुणाल कामरा - विनोदाचा मुखवटा की वैयक्तिक हल्ला?

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 2, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

तुळजापूर नवरात्र महोत्सवात ‘अर्थपूर्ण’ हालचाली?

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी

October 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

October 1, 2026

Recent Posts

  • धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • तुळजापूर नवरात्र महोत्सवात ‘अर्थपूर्ण’ हालचाली?
  • धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी
  • तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!