धाराशिव: धाराशिव येथील निवासी उपजिल्हाधिकारी शोभादेवी विद्यासागर जाधव यांनी उपजिल्हाधिकारी पद मिळविण्यासाठी कोणतीही परीक्षा न देता गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केला आहे.
श्रीमती जाधव या पूर्वी नायब तहसीलदार होत्या. त्यांनी महसूल खात्याअंतर्गत घेण्यात येणारी विभागीय परीक्षा दिली.त्यानतंर त्या तहसीलदार झाल्या. मात्र, उपजिल्हाधिकारी पद मिळविण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा न देता त्यांनी गैरप्रकारांचा अवलंब केल्याचा दावा सुभेदार यांनी केला आहे.
याबाबत सुभेदार यांनी तीन महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत जाधव यांची सेवा पुस्तिकेची महिती शासनाकडे मागितली होती. शासनाने विभागीय आयुक्तांना माहिती देण्यासंदर्भात पत्र दिले. विभागीय आयुक्तांनी सेवा पुस्तिका ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अखत्यारित्यात असतात. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती घ्या अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिला.परंतु, अद्याप त्यांना माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सुभेदार यांनी केला आहे.
सुभेदार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनाही माहिती अधिकार अर्ज केला होता. त्यावर आयुक्तालयाने उत्तर दिले आहे की, त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्याकडे ही माहिती असू शकते.
सर्व सेवा पुस्तके ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्यात सेवा पुस्तकाची माहिती मागितली असता ही माहिती आरडीसी मार्फत दडवली जात आहे. याप्रकरणी माहिती आयुक्तांकडे दाद मागितली जाणार आहे.या प्रकरणी शोभादेवी जाधव यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.