• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

admin by admin
December 15, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये पवनचक्की गुंडांची दहशत, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
7.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : बीडमधील मसाजोग येथे पवनचक्कीच्या वादातून झालेल्या हत्येच्या घटनेनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की गुंडांच्या दहशतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील जवळगा (मेसाई )  गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामात शेतकऱ्यांची परवानगी न घेतल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी काम थांबवले. यामुळे संतप्त झालेल्या ठेकेदाराने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी गुंडांचा वापर केला.

काळ्या रंगाच्या २० स्कॉर्पिओ गाड्यांमधून आलेल्या ४० ते ५० बाऊन्सरनी जवळगा गावात दहशत माजवली. गावातील लोकांना शिवीगाळ करत धमकावण्यात आले. जवळपास दोन तास हा प्रकार सुरू होता. गावकऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर तुळजापूरचे भाजपा नेते विशाल रोचकरी यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

याप्रकरणी कंपनीविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांच्या मदतीनेच पवनचक्की कंपनीचे गुंड दहशत निर्माण करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेने पुन्हा एकदा पवनचक्की प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या गुंडगिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आणखी एक मसाजोग प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तुळजापूरमध्ये अवैध धंद्यांचे पेव फुटले !

Next Post

धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर परीक्षा न देता पदोन्नती मिळवल्याचा आरोप

Next Post
धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर परीक्षा न देता पदोन्नती मिळवल्याचा आरोप

धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर परीक्षा न देता पदोन्नती मिळवल्याचा आरोप

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group