अणदूर गावात दोन कोटी खर्चून बसस्थानक ते आण्णा चौकदरम्यान ४०० मीटर लांबीचा सिमेंट रस्ता बांधला जात आहे. मात्र, १२ मीटर रुंदीच्या या रस्त्यावर अतिक्रमणाचा अडथळा निर्माण झाला असून, नालीचे काम न करता रस्ता बांधला जात असल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे.
अखेर तहसीलदारांची ‘तीन दांडी’नंतर पाहणी!
तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तीन वेळा दौरा टाळल्यानंतर अखेर आज (बुधवार) अणदूरमध्ये पाहणी केली. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालय एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते.
➡ ग्रामपंचायत: “अतिक्रमण हटवण्याचे अधिकार तहसील कार्यालयाचे आहेत!”
➡ तहसील कार्यालय: “ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याची जबाबदारी घ्यावी!”
तहसीलदारांचा आदेश : दोन दिवसांत सर्वे करून अहवाल द्या!
तहसीलदार बोळंगे यांनी तलाठी आणि ग्रामसेवक यांना तातडीने आदेश देत दोन दिवसांत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
➡ नेमके कुणाच्या जागेवर अतिक्रमण आहे?
➡ रस्ता आणि सार्वजनिक जागांवर किती मोठे अतिक्रमण झाले आहे?
याचा सखोल अभ्यास करून पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.
बड्या लोकांचे अतिक्रमण, सार्वजनिक जागांवर डल्ला!
🔸 सर्व्हे नंबर १५५ हा गावठाण क्षेत्र असून, अनेक बड्या व्यक्तींनी अतिक्रमण करून कमर्शियल कॉम्प्लेक्स उभारले आहेत.
🔸 हुतात्मा स्मारक क्षेत्रातही काहींनी अतिक्रमण केले आहे.
🔸 प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरही अतिक्रमण करून सार्वजनिक सुविधांना अडथळा निर्माण केला आहे.
ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालय हतबल!
या प्रकरणात ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालय हतबल झाले आहे.
➡ ग्रामपंचायतीकडे अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही.
➡ तहसील कार्यालयाला राजकीय दबाव आणि प्रशासनातील अडथळ्यांमुळे कारवाई करता आलेली नाही.
आता पुढे काय?
अहवालानंतर अतिक्रमणविरोधी कारवाई होईल की पुन्हा टोलवाटोलवी सुरू राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अणदूरकरांना रस्ता आणि सार्वजनिक जागा मोकळ्या मिळणार का, की कारवाई कागदावरच राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!