तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातील २ कोटींच्या निधीतून बांधला जात असलेला ४०० मीटर लांबीचा सिमेंट रस्ता आता अर्धवट स्थितीत पडून आहे. पंधरा दिवसांपासून काम ठप्प असून, एकेरी मार्गदेखील पूर्ण झालेला नाही. यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
हुतात्मा स्मारक आणि आरोग्य केंद्रासमोरची गॅप कधी भरणार?
रस्त्याच्या कामामध्ये हुतात्मा स्मारक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गॅप सोडण्यात आला आहे. पाईपलाईन चे काम करायचे आहे म्हणून हा गॅप सोडण्यात आला आहे पण १५ दिवस झाले तरी कोणतीही हालचाल नाही.
➡ वाहतुकीची कोंडी: अपूर्ण रस्त्यामुळे वाहनांची गर्दी वाढली असून, वाहतूक कोंडीतून सुटकेसाठी नागरिकांना पर्यायी मार्ग शोधावा लागत आहे.
➡ वाहनचालकांची तक्रार: “काम अर्धवट राहिल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सिमेंट रस्ता सोडून कच्चा रस्ता छोटा असून, समोर वाहन आले की कोंडी होत आहे.
प्रशासनाचा उदासीनपणा, ग्रामस्थ संतप्त
तहसीलदारांनी अतिक्रमण हटवण्यासाठी आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष कारवाईचा पत्ता नाही.
➡ काम का ठप्प आहे?
➡ हुतात्मा स्मारक आणि प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर गॅप कधी भरणार?
➡ वाहतुकीची समस्या कधी सुटणार?
प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांचा इशारा: काम त्वरित सुरू करा!
ग्रामस्थांनी त्वरित काम सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अर्धवट कामामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर प्रशासन आणि कंत्रादाराकडे नाही.
रस्ता तयार होईल का? की राजकारण आणि उदासीनतेच्या गॅपमधूनच प्रवास सुरू राहील?
अणदूरकरांच्या समस्यांचे समाधान कधी होणार, हे अद्यापही अनिश्चित आहे!