• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अणदूरमध्ये गावठी दारूचा सुळसुळाट; मृत्यूचा आकडा वाढतोय, पोलीस प्रशासन कुंभकर्ण झोपेत

admin by admin
December 5, 2024
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
अणदूरमध्ये गावठी दारूचा सुळसुळाट; मृत्यूचा आकडा वाढतोय, पोलीस प्रशासन कुंभकर्ण झोपेत
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर गाव गावठी दारूच्या विळख्यात सापडले आहे. येथे राजरोसपणे विकल्या जाणाऱ्या हातभट्टीच्या दारूने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही दारू युरियापासून बनवली जात असल्याने ती अत्यंत विषारी आहे. या दारूचे सेवन करणाऱ्या अनेकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या महिनाभरातच या गावात पाच जणांचा दारूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अणदूर गावात जवळपास १२ ते १५ ठिकाणी ही दारू बेकायदेशीरपणे विकली जाते. गावठी दारूच्या या अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या आहारी गेलेल्या अनेकांना आपले कामधंदा सोडावे लागले आहेत. यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. तरुण पिढीही या दारूच्या व्यसनात अडकत चालली आहे. यामुळे गावाचे भविष्य धोक्यात आल्याची चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.

गावठी दारूचा हा धंदा नळदुर्ग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. पोलिसांना हप्ते देऊन हा धंदा बेरोकटोक सुरू असल्याचे बोलले जाते. यामुळे पोलिसांवरही गावकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.

गावठी दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असताना प्रशासन मात्र कुंभकर्ण झोपेत असल्याचे दिसत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून हा धंदा बंद करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

धाराशिवच्या लाच प्राध्यापिकेचे नवे नाटक ; फक्त सोयीच्या प्रतिनियुक्त्या रद्द !

Next Post

धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी: ऑनलाईन फसवणुकीत गेलेले ३.७१ लाख रुपये परत मिळवले

Next Post
धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी: ऑनलाईन फसवणुकीत गेलेले ३.७१ लाख रुपये परत मिळवले

धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी: ऑनलाईन फसवणुकीत गेलेले ३.७१ लाख रुपये परत मिळवले

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

September 2, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

September 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांना मोठ्या आव्हानांचा सामना

‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा

September 1, 2026
तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात

September 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026

Recent Posts

  • पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान; तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या
  • तुळजापूर येथील बहुचर्चित निघृण खून खटल्याचा निकाल: सबळ पुराव्याअभावी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता
  • ‘प्रसाद कोंडे-देशमुख माझे OSD-PA नव्हते’; फलटण प्रकरणावर तानाजी सावंतांचा खुलासा
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सवाची प्रशासकीय तयारी पूर्ण; भाविकांच्या सुरक्षेसाठी २८०० पोलिस तैनात
  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!