येरमाळा – येरमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने 26 जुलै 2024 रोजी सकाळी 8:30 वाजता चोराखळी शिवारात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत विशाल कैलास मोरे (वय 25 वर्षे, रा. खडकत, ता. आष्टी, जि. बीड) यास अटक करण्यात आली. मोरे हे एमएच 04 केएफ 9325 या पिकअप वाहनात चार जर्सी गायींची वाहतूक करत होते. यावेळी गायींना वाहनात अत्यंत क्रूर पद्धतीने कोंबून ठेवण्यात आले होते आणि त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेण्यात आली नव्हती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहतूक करत होते. या प्रकरणी पोलिसांनी मोरे यांच्याविरुद्ध प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1) (डी))(एच)(एफ)(के), प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(अ), (1),(2), 5(ब) सह मपोका कलम 119 सह मोवाका कलम 83/177,184 व भा.दं.सं. कलम 281, 324,(4)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी 3,06,000 रुपये किमतीच्या चार गायी आणि पिकअप वाहन जप्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.