उमरगा – इंदिरा चौकात एका वृद्ध महिलेची सोन्याच्या पुडीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. विठ्ठल ग्यानबा जाधव (28 वर्षे, रा. सलगरा, लातूर) या तरुणावर 70 वर्षीय शांताबाई देवीदास बचके (रा. कोरेगाववाडी) यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शांताबाई बचके या इंदिरा चौकातून जात असताना जाधव यांनी त्यांना एक कागदी पुडी दाखवली. पुडीत सोने असल्याचे सांगून त्यांनी शांताबाई यांना त्यांचे जुने दागिने काढून हे नवीन सोने घेण्यास सांगितले. शांताबाई यांनी विश्वास ठेवून आपले दागिने दिले असता जाधव पसार झाला.
या घटनेनंतर शांताबाई बचके यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विठ्ठल जाधव याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 318(2), 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.