तुळजापूर – तालुक्यातील खंडाळा शिवारात 24 जुलै रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार सुरेश देवराव यादव (वय 42, रा. ताकविकी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश यादव हे आपल्या मोटारसायकल (क्र. एमएच 25 एएम 8083) ने लातूरकडून तुळजापूरकडे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या व्हीआरएल कंपनीच्या ट्रक (क्र. एमएच 13 सी.यु 5134) च्या चालकाने हयगयीने ट्रक चालवत यादव यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात यादव हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत सुरेश यादव यांच्या पत्नी मनिषा यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 279, 304(अ) सह मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक करत आहेत.