तामलवाडी – तामलवाडी येथील जय किसान कृषी केंद्रात बनावट रासायनिक खतांचा मोठा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कृषी केंद्राचे मालक महादेव लक्ष्मण चौगुले यांच्यावर बनावट खत विक्रीच्या उद्देशाने साठवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (26 जुलै) दुपारी खत निरीक्षण अधिकारी प्रविण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौगुले यांच्याकडे 20 मॅट्रिक टन बनावट रासायनिक खतांचा साठा आढळून आला. या खताची अंदाजे किंमत 5 लाख 88 हजार रुपये आहे. चौगुले यांनी हा साठा शेतकऱ्यांना विकण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा संशय आहे.
या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 318, 336 अन्वये देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे-महादेव लक्ष्मण चौगुले, रा. कासेगाव ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, कृषी केमिकल ॲन्ड फर्टिलायझर प्लॉट नं 36 लेमन स्ट्रिट राजकोट जय किसान कृषी केंद्र तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 26.07.2024 रोजी 16.10 ते 17.30 वा. सु. तामलवाडी येथे बनावट रासायनिक खताचे 400 पोते 20 मॅट्रीक टन 10:26:26 एन.पी.के. एकुण अंदाजे 5, 88,000₹ किंमतीचा माल संशयास्पद/बनावट अनाधिकृत विनापरवाना हे खत शेतकऱ्यांना विक्री करण्याच्या उद्देशने साठवणुक करुन ठेवलेला मिळून आला.यावरुन फिर्यादी नामे- प्रविण विठ्ठलराव पाटील, खत निरीक्षण निरीक्षक कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव रा. धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.26.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे खत नियंत्रण आदेश खंड 5, 6, 7, 8, 11, 19 (सी), 21, 35 अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे खंड 3(2),(अ), 3(2), (डी), 7, 9 सह भारतीय न्याय संहिता कलम 318(4, 336(2), 336(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.