• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“आधी कामाचा हिशोब द्या, मगच मते मागा!”; नळदुर्गमधील मतदारांचा अशोक जगदाळेंना खडा सवाल

admin by admin
November 27, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
“आधी कामाचा हिशोब द्या, मगच मते मागा!”; नळदुर्गमधील मतदारांचा अशोक जगदाळेंना खडा सवाल
0
SHARES
554
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :  नळदुर्ग नगरपालिकेच्या रणधुमाळीत अशोक जगदाळे हे काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत आहेत. मात्र, मतदानासाठी सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मागील पाच वर्षांच्या ‘कारभारी’ काळातील कामाचा लेखाजोखा मांडावा, अशी जोरदार मागणी नळदुर्गमधील जागरूक मतदारांतून होत आहे.

प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक लढवणारे अशोक जगदाळे यांनी मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावले होते. या काळात त्यांच्या भगिनी रेखाताई जगदाळे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. कागदोपत्री त्या नगराध्यक्ष असल्या तरी नगरपालिकेचा सर्व कारभार आणि सूत्रे अशोक जगदाळे यांच्याच हाती होती, हे संपूर्ण शहराला सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्या काळातील कारभाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारावी, असे मतदारांचे म्हणणे आहे.

विकासाचे काय झाले?

जगदाळे यांच्या कारकिर्दीत शहराला वैभव प्राप्त करून देण्यासाठी नेमके काय प्रयत्न झाले? शहरातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी किंवा गोरगरिबांसाठी कोणत्या ठोस योजना राबविल्या? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या काळात झालेल्या रस्ते आणि गटारींच्या कामांच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निधी खर्चूनही स्मारकांची दुरवस्था

शहरातील हुतात्मा स्मारक, रोकड्या हनुमान मंदिर आणि हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंच्या विकासासाठी भरमसाठ निधी खर्च करण्यात आला. तरीही आज या वास्तूंची अवस्था दयनीय का आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर मते मागण्यासाठी येण्यापूर्वी अशोक जगदाळे यांनी आपल्या ‘कारभारी’ कार्यकाळातील कामांचा सविस्तर लेखाजोखा मांडावा आणि त्यानंतरच जनतेसमोर जावे, अशी संतप्त प्रतिक्रिया मतदारांतून उमटत आहे.

Previous Post

उमरगा ‘शहर विकास आघाडी’च्या ‘व्हिजन’वर ऍड. शीतल चव्हाणांचा हल्लाबोल

Next Post

अमित शिंदे व सोनाली माने यांचे अर्ज वैध तर वाघमारे यांचा अर्ज बाद

Next Post
धाराशिव नगर परिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

अमित शिंदे व सोनाली माने यांचे अर्ज वैध तर वाघमारे यांचा अर्ज बाद

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group