• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा ‘शहर विकास आघाडी’च्या ‘व्हिजन’वर ऍड. शीतल चव्हाणांचा हल्लाबोल

 'गुडगुडी', गुत्तेदारी आणि अवैध धंद्यांवरून विचारले १० थेट सवाल!

admin by admin
November 27, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
उमरगा ‘शहर विकास आघाडी’च्या ‘व्हिजन’वर ऍड. शीतल चव्हाणांचा हल्लाबोल
0
SHARES
593
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: उमरगा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतेच शिवसेना (शिंदे गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘शहर विकास आघाडी’ने पत्रकार परिषद घेऊन विकासाचे ‘व्हिजन’ मांडले. मात्र, या व्हिजनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ऍड. शीतल श्यामराव चव्हाण यांनी आघाडीला १० खोचक आणि थेट प्रश्न विचारून अडचणीत आणले आहे. शहरात चालणारा ‘गुडगुडी’ जुगार, गुत्तेदारी आणि ‘रातोरात’ झालेली युती यावर त्यांनी सडेतोड जाब विचारला आहे.

विकासाच्या बुरख्याआड काळी बाजू?

शहर विकास आघाडीने मांडलेले विकासाचे स्वप्न हे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि आपली प्रतिमा उंचावण्यासाठी असल्याचा आरोप ऍड. चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, याआधीच्या काळात शहरात झालेले अवैध धंदे, ठराविक लोकांचे झालेले आर्थिक लाभ आणि गुंडगिरीला मिळालेले पाठबळ यामुळे आघाडीची बदनामी झाली आहे. आता विकासाचे लोभसवाणे चित्र उभे करून जुन्या पाप झाकण्याचा हा प्रयत्न आहे.

ऍड. चव्हाण यांनी उपस्थित केलेले प्रमुख मुद्दे:

१. अवैध धंदे आणि ‘गुडगुडी’: शहरात अनेक वर्षे ‘गुडगुडी’ नावाचा जुगार सुरु होता, ज्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. हा जुगार आणि पत्त्यांचे मोठे क्लब्स नक्की कोण चालवत होते आणि त्याचा आर्थिक मलाई कुणी खाल्ली? असा सवाल त्यांनी केला आहे.

२. गुत्तेदारी आणि नातेवाईक: नगर विकास खात्याकडून आलेल्या भरमसाठ निधीतून झालेली विकास कामे नक्की कुणाला मिळाली? आघाडीच्या नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना सत्तेचा वापर करून गुत्ते देण्यात आले का? तसेच या कामांसाठीचे मटेरिअल ठराविक ठिकाणांवरूनच का मागवले गेले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

३. अनैसर्गिक युती: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने शिवसेना (शिंदे गट) सोबत केलेली युती ही ‘विकासा’साठी नसून सत्तेसाठी रातोरात घेतलेला एकतर्फी निर्णय आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. ज्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवायचे ठरले होते, त्यांना विचारात न घेता हा निर्णय का घेतला गेला?

४. गुन्हेगारी पार्श्वभूमी: शहर विकास आघाडीतील उमेदवार हे टक्केवारी, हप्तेवसुली, रेशन चोरी आणि अवैध धंद्यांशी संबंधित नाहीत का? याची स्पष्टता आघाडीने करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

माजी आमदारांनी उत्तर टाळले?

यापूर्वी विकास निधीच्या विनियोगाबाबत आपण माजी आमदारांना पत्र लिहून माहिती मागवली होती, परंतु आजतगायत त्यांनी त्या पत्राला उत्तर दिले नसल्याची खंतही ऍड. चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

“तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि अनुभवी आहात, त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असा टोला लगावत ऍड. शीतल चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रश्नांवर शहर विकास आघाडी काय उत्तर देणार, याकडे उमरगावासीयांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिवच्या सामाजिक वनीकरण विभागात ‘ॲडव्हान्स’ कारभार; हजेरी मस्टरवर चक्क भविष्यातील तारखांच्या सह्या!

Next Post

“आधी कामाचा हिशोब द्या, मगच मते मागा!”; नळदुर्गमधील मतदारांचा अशोक जगदाळेंना खडा सवाल

Next Post
“आधी कामाचा हिशोब द्या, मगच मते मागा!”; नळदुर्गमधील मतदारांचा अशोक जगदाळेंना खडा सवाल

"आधी कामाचा हिशोब द्या, मगच मते मागा!"; नळदुर्गमधील मतदारांचा अशोक जगदाळेंना खडा सवाल

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group