• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, November 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : मुर्टा येथे जागेच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

 पाच जणांवर अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

admin by admin
November 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मुर्टा (तुळजापूर) : जागेच्या जुन्या वादावरून एका ३८ वर्षीय महिलेला बेकायदेशीर मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथे घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्टा येथील भीमनगर भागातील रहिवासी पंचशीला नवनाथ लोंढे (वय ३८) या ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास गावात असताना जागेच्या वादावरून वाद उफाळून आला. संशयित आरोपी प्रल्हाद बळी सुरवसे, अशोक प्रल्हाद सुरवसे, लक्ष्मी अशोक सुरवसे, मुक्ताबाई प्रल्हाद सुरवसे आणि शुभम सुधाकर कदम (सर्व रा. मुर्टा, ता. तुळजापूर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी पंचशीला लोंढे यांना अडवले.

त्यानंतर आरोपींनी त्यांना हीन वागणूक देत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. या मारहाणीनंतर पंचशीला लोंढे यांनी ७ नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीच्या जबाबावरून नळदुर्ग पोलिसांनी नमूद पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२) (बेकायदेशीर जमाव), १९०, ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान) सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Previous Post

कळंब : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Next Post

तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव शहर : ज्ञानेश्वर मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेचे गंठण लांबवले;

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मुर्टा येथे जागेच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अपहरण प्रकरणात कळंब पोलिसांची थरारक कारवाई; GPS लोकेशनच्या मदतीने अंबाजोगाईतून आरोपीला पकडले

November 7, 2026

Recent Posts

  • धाराशिव शहर : ज्ञानेश्वर मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेचे गंठण लांबवले;
  • तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी
  • तुळजापूर : मुर्टा येथे जागेच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण
  • कळंब : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
  • अपहरण प्रकरणात कळंब पोलिसांची थरारक कारवाई; GPS लोकेशनच्या मदतीने अंबाजोगाईतून आरोपीला पकडले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!