तुळजापूर – दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता तुळजापूरच्या बोरी येथे कालीदास नरहरी हावळे (वय 55) यांना सुशीला रोहीदास हावळे, मोनिका दयानंद उबाळे, सिमा बबलु ओहाळ, अंकिता ओहाळ, अश्विनी गणेश झेंडे आणि हंसराज रोहीदास हावळे यांनी मारहाण केली. या घटनेत कालीदास हावळे यांच्या पत्नी ललीता आणि मुलगा किरण यांनाही मारहाण करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून कालीदास हावळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पट्टी, दगड आणि विटाने मारहाण केली. तसेच, हावळे यांच्या पत्नी आणि मुलालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या घरातील स्टाईल फर्शी फोडून नुकसान करण्यात आले.
या प्रकरणी कालीदास हावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 118(1), 333, 115(2), 189(2), 191( 2), 190, 351(3), 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.