भुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठेनगर येथील चार आरोपींनी यशपाल गायकवाड आणि त्यांच्या मावस भावाला शेव चिवड्याच्या पैशाच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना 26 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता भुम येथील आठवडी बाजारात घडली. आरोपींनी शिवीगाळ करून, लाथाबुक्यांनी, विळा आणि दगडाने मारहाण करून दोघांना जखमी केले. तसेच या मारहाणीत साक्षीदाराच्या दुकानाचे 15 हजार रुपयांचे नुकसान झाले.
यशपाल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुम पोलीस ठाण्यात नारायण साठे, उमेश साठे, मंगेश साठे आणि दत्तात्रय साठे यांच्याविरुद्ध भा.न्या.सं. कलम 118(1), 352, 351(2), 324 (4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.