येरमाळा : आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तेरखेडा ते खामकरवाडी रोडवर ही घटना घडली. आरोपी दादा शिंदे, शाहजी शिंदे आणि हारकु शिंदे (रा. खामकरवाडी पारधी पिढी ता. कळंब ) यांनी फिर्यादी धनाजी मुंढे ( वय 40 वर्षे, रा. उपळाई ता. कळंब ) यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून 8,000₹ चे नुकसान करुन जिवे ठार मरण्याची धमकी दिली.
फिर्यादी धनाजी मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३२४ (४)(५), ३५२, ३५१(२) (३), ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.