बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेडसिंगा येथे शेत रस्त्याच्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य कळीराम आगळे आणि बळीराम भिमराव आगळे (दोघेही रा. मेडसिंगा) यांनी ओंकार अमोल पाटील (वय २५, रा. मेडसिंगा) यांना १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात ओंकार पाटील जखमी झाले.
या घटनेनंतर ओंकार पाटील यांनी १६ ऑगस्ट रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपींविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.