शिराढोण – येथे एका 34 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच घरात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, गावातील एका तरुणाने 2 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा तिच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.
एक 34 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि.02.08.2024 ते 23.00 वा. सु. व दि.16.08.2024 रोजी 22.30 वा. सु. ही आपल्या राहत्या घरी एकटी असताना गावातील एका तरुणांनी घरात येवून चाकूचा धाक दाखवून तु मला फार आवडतेस असे म्हणून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. यानंतर त्या तरुणांनी तु जर कोणास काही सांगितले तुला व तुझ्या नवऱ्यास व मुलास जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.
पीडित महिलेने 17 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भादंविच्या कलम 64, 64 (2)(एम), 333, 352, 351 (1)(4) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडितेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.