धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, वाशी आणि शिराढोण पोलीस ठाण्यांमध्ये मारहाणीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा: 27 सप्टेंबर रोजी रात्री उमरगा तालुक्यातील मुळज येथे आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून पाच जणांनी अमर वरवटे यांना मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून वरवटे यांना गंभीर जखमी केले.
आरोपी नामे-रवि उर्फ बाळु गहिनीनाथ चव्हाण,प्रशांत उर्फ गोटु गहिनीनाथ चव्हाण,सतिश बाबुराव चव्हाण, वैभव गोविंदराव सांळुके, सदाशिव सांळुके सर्व रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 27.09.2024 रोजी 21.45 वा. सु. संभाजी चौक मुळज येथे फिर्यादी नामे-अमर गुलाबराव वरवटे, वय 43 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमर वरवटे यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 189( 2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: 28 सप्टेंबर रोजी वाशी तालुक्यातील पारा येथे शेतात बैल व कुळव येण्याच्या कारणावरून सहा जणांनी सर्जेराव ढाकणे यांना व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी, चाबुकाची लोखंडी विळत, औताचे रुमने व दगडाने मारहाण करून जखमी केले.
आरोपी नामे-बालाजी ढाकणे, गयाबाई मंचीक ढाकणे, मंचीक सोपान ढाकणे, सारिका बाजीराव ढाकणे, सोनाजी बाजीराव ढाकणे, बाजीराव ढाकणे सर्व रा. पारा ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.28.09.2024 रोजी 17.00 वा. सु. पारा शिवारातील शेत गट नं 316 मध्ये फिर्यादी नामे-सर्जेराव निवृत्ती ढाकणे, वय 50 वर्षे, रा. पारा ता.वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा दिलीप व पत्नी यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून बैल व कुळव शेतात येण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाबुकाची लोखंडी विळत, औताचे रुमने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सर्जेराव ढाकणे यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण: 27 सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे पावसाचे पाणी घराकडील रस्त्यावर सोडल्याच्या कारणावरून चार जणांनी शितल उगले यांना व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले.
आरोपी नामे-बालाजी महादेव शेळके, सुदर्शन बालाजी शेळके,हानुमंत बालाजी शेळके,कानुपात्रा बालाजी शेळके सर्व रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.09.2024 रोजी 07.30 वा. सु. खामसवाडी येथे फिर्यादी नामे-शितल रमेश उगले, वय 48 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पावसाचे पाणी घराकडील रस्त्यावर सोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे पती व मुले हे भाडंण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शितल उगले यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिन्ही घटनांमध्ये आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.