• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बाबांच्या दुकानात चिप्स कुरकुऱ्यांआडून गुटख्याचा महाप्रसाद? पोलिसांचा ‘कुरकुरीत’ छापा!

admin by admin
April 8, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
बाबांच्या दुकानात चिप्स कुरकुऱ्यांआडून गुटख्याचा महाप्रसाद? पोलिसांचा ‘कुरकुरीत’ छापा!
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: मंडळी, धाराशिव शहरात सध्या एका दुकानाची भलतीच चर्चा सुरू आहे. नाव आहे  “बाबा टेंडर्स‘. आता नाव ऐकून वाटेल की इथे  बाबांच्या आशीर्वादाने मोठे मोठे टेंडर मिळत असतील, पण छे! इथे दर्शनी भागात मिळतात लहान मुलांचे आवडते चिप्स आणि कुरकुरे. पण खरा ‘खेळ’ तर पडद्यामागे सुरू होता म्हणे!

आपल्या शहर पोलिसांना कुठूनतरी ‘कुरकुरीत’ बातमी मिळाली की, या ‘बाबा टेंडर्स‘मध्ये चिप्स-कुरकुऱ्यांच्या पाकिटांमागून चक्क गुटख्याच्या पुड्यांचा डोंगर विकला जातोय. मग काय, पोलिसांनी ठरवलं की या ‘टेंडर’ची जरा चौकशी करावी!

आज पोलिसांनी एकदम फिल्मी स्टाईलने दुकानावर छापा टाकला. दुकानात समोर गोंडस पाकीटं दिसत होती, पण मागच्या बाजूला जाताच पोलिसांचे डोळे विस्फारले. तिथे गुटख्याचा एवढा मोठा साठा सापडला की, विचारू नका! जणू काही ‘बाबां’नी गुटख्याचाच ‘महाप्रसाद’ वाटायला सुरुवात केली होती!

पण मंडळी, खरी गंमत तर पुढेच आहे! आता बातमी अशी आहे की, हा जप्त केलेला गुटख्याचा माल दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणाहून पकडला असं दाखवण्याचा ‘घाट’ घातला जातोय. म्हणजे, पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला ‘महाप्रसाद’ आता म्हणे, “मी इथे नव्हतोच!” असं म्हणायच्या तयारीत आहे.

आणि सगळ्यात मोठा विनोद म्हणजे, या सगळ्या प्रकरणात पडद्यामागचे खरे ‘ बाबा’ (म्हणजे मेन मालक -पिके ) नामानिराळे राहून, दुसऱ्याच कुण्या ‘भक्ता’ला बळीचा बकरा बनवण्याची जोरदार ‘टेंडर’ प्रक्रिया पडद्यामागे सुरू असल्याची कुजबुज आहे. यालाच म्हणतात ‘तोडपाणी’ची किमया!

आता पोलीस नक्की कोणत्या ‘टेंडर’ला मान्यता देतात आणि खरा ‘ बाबा’ समोर येतो का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. तोपर्यंत, धाराशिवकरांनी चिप्स खाताना जरा जपूनच – आतून गुटख्याची पुडी निघाली तर आश्चर्य वाटायला नको! 😉

Previous Post

धाराशिव जमीन प्रकरणात अनुसूचित जाती आयोगाचे चौकशीचे आदेश; अनेक अधिकाऱ्यांवर ठपका

Next Post

धाराशिव: पवनचक्कीतील तांबे चोरणारी टोळी गजाआड

Next Post
धाराशिव: पवनचक्कीतील तांबे चोरणारी टोळी गजाआड

धाराशिव: पवनचक्कीतील तांबे चोरणारी टोळी गजाआड

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group