बेंबळी: जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाल्याने एकाला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फिर्यादी योगेश जाधव हे बँकेतून बाहेर पडत असताना त्यांच्या मोटरसायकलला आरोपींच्या मोटरसायकलचा धक्का लागला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वादातून रागात आलेल्या आरोपींनी योगेश यांना शिवीगाळ केली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. यानंतर त्यांना काठीनेही मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी फिर्यादी योगेश जाधव यांनी दिनांक 18 जुलै 2024 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 118 (2), 115(2), 352, 351 (1) (3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
गुन्हा दाखल
आरोपी नामे- बबल्या सुलतान शेख, सोहेल राजाज शेरीकर दोघे रा. बेंबळी ता. जि. धराशिव यांनी दि. 17.07.2024 रोजी 14.00 वा. सु. जिल्हा मध्यवर्ती बॅक बेंबळी येथे फिर्यादी नामे- योगेश पांडुरंग जाधव, वय 41 वर्षे, व्यवसाय नोकरी, जिल्हा मध्यवर्ती बॅक बेंबळी ता. जि. धाराशिव यांचे मोटरसायकलला नमुद आरोपीच्या मोटरसायकलचा धक्का लागल्याने ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी योगेश जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- योगेश जाधव यांनी दि.18.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 118 (2),115(2), 352, 351 (1) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.