धाराशिव – सोलापूर रोड, बार्शी येथील गणेश अंबऋषी वाघमारे (वय ३५) यांनी १९ जानेवारी २०२४ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी सकाळी १० ते १२ या वेळेत आपल्या राहत्या घराच्या लोखंडी आडूसला गळफास लावून जीवन संपवले.
या आत्महत्येप्रकरणी त्यांची बहीण शुभांगी संतोष शिनगारे (वय ३५) यांनी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शिंगोली येथील शशिकांत शिंदे, सुरज शिंदे आणि महेश कदम यांनी गणेश वाघमारे यांना धाब्यावर कामासाठी ५ हजार रुपये उचल दिली होती. गणेश कामावर गेला असता, आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली आणि जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली. ‘पैसे परत देत नाहीस तर पोलीस केस करतो’ अशी धमकी दिल्याने गणेश यांनी त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, असे शुभांगी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीच्या आधारे आनंदनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 108, 115(2), 352, 351(2)(3) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.