बेंबळी :आरोपी नामे-1)बालाजी शिवाजी भोसले, 2)मनिषा बालाजी भोसले, 3) वर्षा बालाजी भोसले, 4) श्रध्दा धुमाळ, 5)श्रध्दा धुमाळ, 6) शिवशाला महादेव भोसले, 7) महादेव भोसले, 8) विठ्ठल पोपट भोसले, 9) शिवाजी मानिकराव भोसले, 10) व्यंकट पोपट भोसले, सर्व रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 08.30 ते 09.00 वा. सु. खामसवाडी ता.जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-प्रियंका परमेश्वर भोसले, वय 36 वर्षे, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव या व त्यांची मुलगी प्रज्ञा यांना नमुद आरोपी हे शिवीगाळ करत होते ते विचारण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, पाईप, विटाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा शंभु हा भांडण सोडवण्यास आला असता त्यासही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन पाईपने मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रियंका भोसले यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे -1) परमेश्वर पांडुरंग भोसले, 2) प्रियंका परमेश्वर भोसले, 3) गौरी प्रज्ञा परमेश्वर भोसले, शंभु परमेश्वर भोसले, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव, 5) शाम उत्तमराव होनसनाळे, 6) प्रविण शाम होनसनाळे, 7) बंटी शाम होनसनाळे रा. बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 08.30 ते 09.00 वा. सु. खामसवाडी ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-बालाजी शिवाजी भोसले, वय 48 वर्षे, रा. खामसवाडी ता. जि. धाराशिव यांचा नातु शिवांश वय 2 वर्षे यांने आरोपी नामे गौरी प्रज्ञा हिस धरल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी भोसले यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी आरोपी नामे-1) विमल विलास पवार, 2) श्रीकृष्णा विलास पवार, 3) श्रीधर विलास पवार, 4) विलास दत्तात्रय पवार, 5)श्रीराम विलास पवार, सर्व रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 14.30 वा. सु. कसबे तडवळा व कोंबडवाडी शेतशिवार येथे फिर्यादी नामे- रेशमा राहुल लाटे, वय 37 वर्षे, रा. गजानन मेडीकल कसबे तडवळा ता. जि. धाराशिव हा.मु. टिंगरे नगर विश्रांत वाडी पुणे यांना व त्यांची आई, बहीण, भाउ यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्यादीची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड,विळा, लोखंडी साखळी त्याला बळींबा असलेलीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेशमा लाटे यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324,354, 323, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी आरोपी नामे-1)मिरा भारत पवार, 2) सौदागर भारत पवार, 3) सौरभ मांगडे,4) सौरभ हावलदार, 5) ज्योती भारत पवार, 6) चंद्रभारत पवार, 7) सोनी भारत पवार, 8) माउली भारत पवार सर्व रा. कसबे तडवळा यांनी दि. 21.01.2024 रोजी 14.00 वा. सु. शेत गट नं 76 कसबे तडवळा शिवार येथे फिर्यादी नामे- विलास दत्तात्रय पवार, वय 69 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्यादीची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी साखळीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मुलगा भांडण सोडवण्यास गेला असता त्यांसही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विलास पवार यांनी दि.21.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.