• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 29, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बेंबळी : बरमगाव येथे नालीच्या वादावरून तरुणाला मारहाण

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
162
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी  –  घरासमोरील नालीच्या वासाबाबत विचारणा केल्याच्या किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करून रस्त्यावर ढकलून दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना बरमगाव येथे घडली आहे. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी गोविंद वाघमारे (वय ४३, रा. बरमगाव, ता. जि. धाराशिव) हे दि. १६.०४.२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बरमगाव येथील सिमेंट रस्त्यावर होते. यावेळी आरोपी नामे- पोपट भागवत वाघमारे, केसरबाई भागवत वाघमारे, आशाबाई परमेश्वर वाघमारे, सविता पोपट वाघमारे (सर्व रा. बरमगाव) यांनी बालाजी वाघमारे यांना त्यांच्या घरासमोरील नालीचा वास येत असल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली या कारणावरून शिवीगाळ केली.शिवीगाळ झाल्यानंतर आरोपींनी बालाजी वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. तसेच त्यांना रस्त्यावर ढकलून दिले.

या मारहाणीत आणि रस्त्यावर पडल्याने बालाजी वाघमारे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर, फिर्यादी बालाजी वाघमारे यांनी दि. २३.०४.२०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरुन, आरोपी पोपट वाघमारे, केसरबाई वाघमारे, आशाबाई वाघमारे आणि सविता वाघमारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११७(२), ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गंभीर दुखापत करणे आणि मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेंबळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 होळी येथे शेतीच्या कारणातून दिव्यांग पत्नीसह कुटुंबाला विळा, पाईपने मारहाण

लोहारा –  मुलीच्या नावे शेती का करत नाही या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी मिळून एका व्यक्तीला, त्यांच्या दिव्यांग पत्नीला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलाला विळा व लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना लोहारा तालुक्यातील होळी येथे घडली असून, या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अपंग व्यक्ती अधिनियम कायद्याचाही समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब भुजंगराव पाटील (वय ५६, रा. होळी, ता. लोहारा) हे आपली दिव्यांग पत्नी सुमन यांच्यासह दि. २०.०४.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास होळी येथे होते. यावेळी आरोपी नामे- बबन गायकवाड, विशाल बबन गायकवाड, अमोल गायकवाड (सर्व रा. तोरंबा), जयकुमार कदम यांनी तिथे येऊन ‘मुलीच्या नावे शेती का करत नाही’ या कारणावरून नानासाहेब पाटील आणि त्यांची दिव्यांग पत्नी सुमन यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

शिवीगाळ केल्यानंतर आरोपींनी नानासाहेब पाटील आणि सुमन यांना लाथाबुक्क्यांनी तसेच विळा व लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. हा प्रकार पाहून त्यांचा मुलगा किसन भांडण सोडवण्यासाठी आला असता, आरोपींनी त्यालाही शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली, यात तोही जखमी झाला. मारहाण केल्यानंतर आरोपींनी पाटील कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर, जखमी नानासाहेब भुजंगराव पाटील यांनी दि. २३.०४.२०२५ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून, आरोपी बबन गायकवाड, विशाल गायकवाड, अमोल गायकवाड, जयकुमार कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) सह अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ चे कलम ९२ अन्वये गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि दिव्यांग व्यक्तीला त्रास देणे अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोहारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

भूम येथे जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉड, काठीने मारहाण

Next Post

धाराशिव: भरदिवसा घरफोडी, ४.४७ लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: भरदिवसा घरफोडी, ४.४७ लाखांचा मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

June 28, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

June 28, 2025
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

June 28, 2025
नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

June 28, 2025
अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group