भूम – फिर्यादी नामे-शंकर सर्जेराव माळी, वय 53 वर्षे, रा. कसबा भुम ता. भुम जि धाराशिव यांचे एम. आय. डी. सी. भुम चे बी 15 शेड मधील अंदाजे 2,24,640₹ किंमतीचे सोयाबीनचे 72 कट्टे हे दि.19.12.2023 रोजी 19.30 ते दि. 20.12.2023 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर माळी यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 461,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-निलेश हरी मंडले, वय 19 वर्षे, रा. कदमापूर, ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 14 एसी 2089 ही दि.15.12.2023 रोजी 10.00 ते 15.00 वा. सु उमरगा बसस्थानक येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निलेश मंडले यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे-विकास सुनिल वाघमारे, वय 26वर्षे, रा. डिकसळ, ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 55,000 ₹ किंमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र एमएच 04 ईएल 5234 हा दि.08.12.2023 रोजी रात्री 21.00 ते दि. 09.12.2023 रोजी 05.00 वा. सु. विशाल बॅटरीज समोर डिकसळ चौक येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास वाघमारे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-अजित दगडू सांगवे, वय 24 वर्षे, रा. नारंगवाडी, ता. उमरगा, जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची होंडा ॲक्टीवा स्कुटी क्र एमएच 12 एफडब्ल्यु 0279 ही दि.12.12.2023 रोजी 15.30 ते 18.30 वा. सु. प्रेमनाथ महाराज मंदीराचे समोर पायरीजवळ माडज येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजित सांगवे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे-मारुती विलास सुरवसे, वय 36 वर्षे, रा. शिवाजीनगर, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 70,000 ₹ किंमतीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25एझेड 8433 काळ्या रंगाची ही दि.18.12.2023 रोजी रात्री 22.00 ते दि. 19.12.2023 रोजी 05.00 वा. सु. फिर्यादी मारुती सुरवसे यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मारुती सुरवसे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- वैभव बळवंत वाळेकर, वय 41 वर्षे,रा. चोपाड, विठ्ठल मंदीर सोलापूर ता. जि. सोलापूर हे संभाजीनगर ते सोलापूर येथे त्यांची टेंम्पो ट्रॅव्हल्स क्र एमएच 13 सी 6282 च्या टपावर दोरीने पांढरी ताडपत्री टाकुन बांधून झाकुन ठेवलेल्या लग्न साहित्याच्या 8 बॅग ज्यामध्ये पैठण्या, कांचीवरम, सिल्क, मोरपंखी व इतर काही अशा 15 साड्या, लेडीज ड्रेस, नवरदेवाचे लग्नातील साहित्य, मेकअप बॉक्स, 3 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन अँटीक सोन्याचे मणी असा एकुण 2,71,000₹ किंमतीचा माल हा दि. 15.12.2023 रोजी 19.15 ते 23.45 वा. सु. 5 जी हॉटेल बीड घाट ते येडशी टोलनाक्याजवळील महालक्ष्मी हॉटेल दरम्यान हायवे रोडवर अज्ञात व्यक्तीने टेंम्पो ट्रॅव्हल्स ताडपत्री फाडून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैभव वाळवेकर यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.