परंडा – आरोपी नामे- 1) योगेश परमेश्वर मेटकरी, रा. संगमपार्क परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.20.12.2023 रोजी 12.25 वा. सु. फिर्यादी नामे-विकास मोहन नागटिळक, वय 30वर्षे, व्यवसाय- तलाठी सज्जा खासापुरी रा. खासापुरी ता. परंडा जि. धाराशिव हे त्यांचे कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा आला व दोन वर्षापुर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात धरुन तु दोन वर्षापुर्वी माझा वाळूचा ट्रॅक्टर पकडला होता, तालुक्यामध्ये राजरोसपणे वाळुची चोरी चालू आहे तुला दिसत नाही का? असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व फिर्यादीस ऑफीसच्या बाहेर आणुन ढकलून देवून जखमी करुन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास नागटिळक यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 353, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
पांढरे कपडे घालून का फिरतो म्हणून मारहाण
तुळजापूर :आरोपी नामे- 1)गणेश रोचकरी,2) लखन भोसले,3) विश्वजीत अमृतराव, 4) सुशांत सपाटे, सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव व सोबत दोन इसम( नाव पत्ता माहित नाही) यांनी दि.16.12.2023 रोजी 21.00 वा .सु. हाडको येथील हंगरगेकर शाळेच्या शेजारी मैदानात तुळजापूर येथे फिर्यादी नामे- गोरख भागवत पारधे, वय 31 वर्षे, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु आमच्या समोर पांढरे कपडे घालून फिरतो का असे म्हणून दहशत निर्माण करुन जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, बियरची बाटलीने मारहण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे समोर पिस्तुलच्या वरचा भाग खाली वर करुन कॉक करुन फिर्यादीचे कानसिलावर लावून जातीवाचक शिवीगाळ करुन फिर्यादीचे तोंडावर लघुशंका करुन सुपारी खावून तोंडावर थुंकली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गोरख पारधे यांनी दि.20.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 307, 324, 143, 147, 148, 149, 504, 506, भा.दं.वि.सं.3(1) (ए), 3(1) (आर), 3 (1) (एस), 3(2)(व्हि), 3(2) (व्हि) (ए) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.