• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम हादरले! मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या संशयावरून टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉड, काठीने बेदम मारहाण

admin by admin
September 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
637
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम – मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या क्षुल्लक कारणावरून सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लोखंडी रॉड, सळई, काठी आणि पट्ट्याने अमानुष मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना भूम तालुक्यातील सुकटा गावाजवळ घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या भावाला आणि मित्रालाही या टोळक्याने मारहाण केली. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बजरंग अण्णा गोयकर (वय ३७, रा. घाटनांदुर, ता. भूम) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुकटा गावाजवळ दादा गलांडे यांच्या शेताजवळ घडली. फिर्यादी बजरंग गोयकर हे तिथे असताना आरोपींनी “तू आमच्या मोबाईलमध्ये फोटो का काढले?” असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपी पांडुरंग पांढरे, संकेत साळवे (दोघे रा. सुकटा), संदीप सरवदे (रा. भूम), भरत कांबळे (रा. भवानवाडी), पवनचक्कीचे जाधव, सचिन जानकर आणि प्रदीप पिसे यांनी गैरकायदेशीररित्या जमाव जमवून बजरंग गोयकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या टोळक्याने त्यांना लाथाबुक्क्या, काठी, लोखंडी सळई, पट्टा आणि लोखंडी टॉमीने बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, हा प्रकार पाहून बजरंग यांचा चुलत भाऊ स्वप्नील गोयकर आणि मित्र ज्ञानेश्वर करगळ हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींनी बजरंग गोयकर यांचा मोबाईल फोन फोडून त्यांचे नुकसान केले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर बजरंग गोयकर यांनी सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार दंगल घडवणे, जीवघेणा हल्ला करणे, मारहाण करणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी भूम पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; शेती साहित्य आणि वाहनाचे पार्ट लंपास

Next Post

परंडा तालुक्यातील घारगावात टोळक्याचा एकाच कुटुंबावर हल्ला; कोयता, काठीने तरुणास बेदम मारहाण

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

परंडा तालुक्यातील घारगावात टोळक्याचा एकाच कुटुंबावर हल्ला; कोयता, काठीने तरुणास बेदम मारहाण

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात एअर पिस्टल बाळगणाऱ्या चौघांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी रॉड अन् सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण; ६ जणांवर अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशीत हद्दीखुना पाडताना निवासी नायब तहसीलदारांना मारली आडकाठी; ८ जणांवर गुन्हा दाखल

June 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group