उमरगा – उमरगा शहरातील कार्ले प्लॉट महमंदीया डिग्गी रोड येथे अवैधपणे चालणाऱ्या कत्तलखान्याजवळ तीन म्हशी बेकायदेशीरपणे बांधून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अब्दुल फाईज उर्फ बाबा म. हनिफ कुरेशी (वय ४५, रा. कार्ले प्लॉट) यांच्याविरुद्ध उमरगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८.१५ वाजता कार्ले प्लॉट येथील अवैध कत्तलखान्याजवळ तीन म्हशी बांधून ठेवल्या होत्या. १७,००० रुपये किमतीच्या या म्हशींना चारा आणि पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने वागणूक दिल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि म्हशींना ताब्यात घेतले. कुरेशी यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५, ५(ब), ६, ९, ११ सह ३२५ भ.न्या.सं.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. माने करत आहेत.