भुम : भुम पोलीस ठाण्याचे पथक दि.26.04.2024 रोजी 20.15 वा. सु. पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास आरोपी नामे-राजु लक्ष्मण माने, वय 34 वर्षे, रा. शिवशंकर नगर भुम ता. भुम जि. धाराशिव हा मा. उपविभागीय दंडाधिकारी भुम जि. धाराशिव यांचे आदेश क्र 2023/ दंडणीय/हद्दपार/ क्र.56/एम.आर-14 दि. 27.12.2023 अन्वये धाराशिव जिल्ह्यातुन हद्दपार असताना परवानगीशिवाय प्रॉपर भुम येथील डॉ. कोकाटे हॉस्पीटल येथे मिळून आला. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- 142 अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी चोरी
येरमाळा : फिर्यादी नामे- वैष्णव शंकर विर, वय 27 वर्षे, रा. सुतमिल रोड कापडमिल विठ्ठल मंदीर जवळ लातुर ता.जि. लातुर यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंन्डा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 12 एलबी 5204 जिचा चेसी नं-ME 4 KC9CDE873687 व इंजिन नं.- KC09E86724079 ही दि.24.04.2024 रोजी 10.00 ते 12.15 वा. सु. प्रतिक हॉटेलच्या शेजारी येरमाळा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वैष्णव विर यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : आरोपी नामे- आशीष मोंडल रा. नकफुल सभाईपुर बोनगाव 24 परगाणा उत्तर पश्चिम बंगाल यांनी दि.25.04.2024 रोजी 21.00 ते दि. 26.04.2024 रोजी 07.00 वा. सु. कन्हेरवाडी शिवारातील कोठाळवाडी पाझर तलाव येथे गाळ काढणे करीता लावलेले तिन टिप्पर मधील 375 लिटर डिझेल एकुण 34335 ₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र सुदाम मिटकरी, वय 45 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.