राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी, दिनांक २९ मार्च २०२५ रोजी तुळजापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या दौऱ्याचा केंद्रबिंदू फक्त तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणे इतकाच असणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा तुळजापूर दौरा थोडक्यात असा आहे:
- सकाळी १०.४० वाजता तुळजापूर हेलिपॅडवर आगमन.
- १०.४५ वाजता तुळजाभवानी मंदिराकडे प्रयाण.
- १०.५० ते ११.२० वाजेपर्यंत तुळजाभवानी मातेचे दर्शन.
- ११.२५ वाजता तुळजापूर हेलिपॅडवरून पुढील प्रवास.
मुख्यमंत्र्यांच्या या धार्मिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणावर कोणतीही चर्चा अथवा बैठक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरण सध्या चांगलेच गाजत असून आरोपींवर मकोका लागू करण्याची मागणी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन देण्याचे ठरवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खात्याचा कार्यभार असल्याने पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश देतील का? याबाबत उत्सुकता आहे. ड्रग्ज प्रकरणी कडक निर्देश देण्याची मागणी देखील जोर धरत आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शनिवार, दिनांक २९ मार्च, २०२५ रोजीचे प्रस्तावित कार्यक्रम:
मेघदूत निवासस्थान (सकाळी):
- ०८.३० वा. – मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबईकडे प्रयाण.
- ०९.०० वा. – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ, मुंबई येथे आगमन.
- ०९.३५ वा. – विमानाने सोलापूरकडे प्रयाण.
- १०.२० वा. – सोलापूर विमानतळ येथे आगमन.
- १०.२५ वा. – हेलिकॉप्टरने तुळजापूर, जि. धाराशिवकडे प्रयाण (१५ मिनिटे)
- १०.४० वा. – तुळजापूर हेलिपॅड, जि. धाराशिव येथे आगमन (अक्षांश १७ ५९ ३८, रेखांश ७६ ०४ ४०)
- १०.४५ वा. – मोटारीने तुळजाभवानी मंदिराकडे प्रयाण.
- १०.५० वा. – तुळजाभवानी मंदिर येथे आगमन व राखीव (३० मिनिटे)
- ११.२० वा. – मोटारीने तुळजापूर हेलिपॅडकडे प्रयाण.
- ११.२५ वा. – तुळजापूर हेलिपॅड येथे आगमन.
- ११.३० वा. – हेलिकॉप्टरने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण.
- ११.५५ वा. – जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आगमन (२५ मिनिटे) (अक्षांश १७ ३९ ४४, रेखांश ७५ १८ १६)
दुपारी:
- १२.०० वा. – मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण.
- १२.१० वा. – विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व राखीव (१ तास ५० मिनिटे)
- ०२.०० वा. – मोटारीने पंढरपूर रोपवाटिका हेलिपॅडकडे प्रयाण.
- ०२.१० वा. – पंढरपूर रोपवाटिका हेलिपॅड येथे आगमन.
- ०२.१५ वा. – हेलिकॉप्टरने नरसिंहपूर, ता. इंदापूर, जि. पुणेकडे प्रयाण (१५ मिनिटे)
- ०२.३० वा. – नरसिंहपूर हेलिपॅड, ता. इंदापूर, जि. पुणे येथे आगमन.
- ०२.३५ वा. – मोटारीने श्री लक्ष्मी नरसिंह मंदिराकडे प्रयाण.
- ०२.४५ वा. – श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर येथे आगमन व राखीव (१ तास)
- ०३.१५ वा. – मोटारीने पोलीस स्टेशन, नरसिंहपूरकडे प्रयाण.
- ०३.२० वा. – पोलीस स्टेशन, नरसिंहपूर येथे आगमन.
- ०३.२० वा. – पोलीस स्टेशन, नरसिंहपूरचे उद्घाटन.
- ०३.३५ वा. – मोटारीने नरसिंहपूर हेलिपॅडकडे प्रयाण.
- ०३.४० वा. – नरसिंहपूर हेलिपॅड येथे आगमन.
- ०३.४५ वा. – हेलिकॉप्टरने बारामती विमानतळ, जि. पुणेकडे प्रयाण (अक्षांश १७ ५८ ३३, रेखांश ७५ ०७ ३९)