• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सत्य बोलण्याची किंमत: धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांच्या सावटाखाली पत्रकारिता!

admin by admin
May 24, 2025
in सडेतोड
Reading Time: 1 min read
सत्य बोलण्याची किंमत: धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांच्या सावटाखाली पत्रकारिता!
0
SHARES
305
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या एका शासकीय अधिकाऱ्याचा तो फोन आला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. “साहेब, जरा अलर्ट राहा,” तो अधिकारी दबक्या आवाजात म्हणाला. “तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा कट शिजतोय.” मी क्षणभर स्तब्ध झालो. मी? खंडणी? ज्याने आयुष्यभर सत्याची कास धरली, ज्याने निर्भीडपणे समाजासमोर वास्तव मांडलं, त्याच्यावर असा आरोप? हा निव्वळ हास्यास्पद प्रकार होता. पण वास्तव हे अनेकदा कल्पनेपेक्षाही विचित्र असतं, हेच खरं.

मी त्या अधिकाऱ्याला विचारलं, “मी कुणाला खंडणी मागितली? आणि मी कधी मागणारही नाही. सत्य बोलणं, सत्य लिहिणं हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी हजारवेळा करेन!” त्यावर तो अधिकारी हताशपणे म्हणाला, “साहेब, लोकांना सत्य पचत नाही. तुमचं सत्य लिखाणच त्यांच्या डोळ्यात खुपतंय.” कोण आहेत हे लोक? सत्ताधारी पक्षाचे दोन चमचे आणि त्यांना साथ देणारा एक पोलीस अधिकारी! व्वा! लोकशाहीचे हेच ते आधारस्तंभ!

सोमवार, १९ मे रोजी आलेला तो फोन माझ्या डोक्यात चक्रासारखा फिरत होता. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा हा काही पहिला डाव नाही. तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण असो, जिल्हा नियोजन समितीच्या २६८ कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती असो, धाराशिव शहरातील १४० कोटींचं रस्ते प्रकरण असो किंवा तुळजापूरचं आठ कोटींचं बस स्टँड प्रकरण असो; ‘धाराशिव लाइव्ह’ने निर्भीडपणे सत्य जनतेसमोर मांडलं. आणि याच सत्यामुळे सत्ताधारी नेत्याच्या पोटात दुखायला लागलं. आता त्याच नेत्याचे चमचे मला खोट्या गुन्ह्यात अडकवून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.

गेली ३५ वर्षे मी पत्रकारितेत आहे. ‘केसरी’, ‘लोकमत’, ‘एकमत’, ‘लोकसत्ता’ अशा मान्यवर दैनिकांत मी काम केलंय. १३ वर्षांपूर्वी ‘धाराशिव लाइव्ह’ हे माझं स्वतःचं डिजिटल चॅनल सुरू केलं. निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड बातम्या देणं, हेच आमचं ब्रीद. आम्ही कुणाचा मुलाहिजा बाळगत नाही. जर सत्य बातम्या देणं हा गुन्हा असेल, तर हो, मी गुन्हेगार आहे! आणि हा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करेन, पण कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.

याआधीही मला ट्रोल करण्यात आलं, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. आता तर थेट खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही भिणार नाही, आम्ही हटणार नाही! सत्य कधी लपत नाही आणि सत्याचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. असल्या धमक्यांनी आणि खोट्या आरोपांनी जर कुणी विचार करत असेल की आम्ही गप्प बसू, तर तो त्यांचा भ्रम आहे. आमची लेखणी तळपत्या तलवारीसारखी आहे, जी भ्रष्टाचारावर आणि अन्यायावर वार करतच राहील. ये पब्लिक है, सब जानती है!

  • सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 
Previous Post

धाराशिवच्या रस्त्यांचा ‘अ‍ॅपल’ की ‘रेडमी’ घोळ? २२ कोटी वाचले, पण श्रेयवादाच्या ‘रिंगटोन’ने कान किटले!

Next Post

रितू खोकर यांनी धाराशिव पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला; आव्हानांचे डोंगर समोर

Next Post
धाराशिव पोलीस अधीक्षकपदी रितू खोकर यांची नियुक्ती, संजय जाधव यांची बदली

रितू खोकर यांनी धाराशिव पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला; आव्हानांचे डोंगर समोर

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 24, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

June 24, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

June 24, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group