मुरुम – दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता चिंचोली भुयार येथील शेत गट क्रमांक ४३६ मध्ये शेत रस्त्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी मिळून एका वृद्धाला आणि त्यांच्या दोन मुलांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेषेराव विठ्ठल जोमदे (वय ६० वर्षे, रा. चिंचोली भुयार) हे आपल्या शेतात काम करत असताना बालाजी तुकाराम जोमदे, जालींदर तुकाराम जोमदे, राजेंद्र तुकाराम जोमदे, सुनिल बालाजी जोमदे, स्वप्निल बालाजी जोमदे आणि आतिष जालींदर जोमदे (सर्व रा. चिंचोली भुयार) यांनी त्यांना शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादींची मुले राम आणि लक्ष्मण हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेमुळे शेषेराव जोमदे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुरुम – दिनांक १६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २.३० वाजता चिंचोली भुयार येथील शेत गट क्रमांक ४८५ मध्ये शेत रस्त्यावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका व्यक्तीला आणि त्यांच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी तुकाराम जोमदे (वय ५५ वर्षे, रा. चिंचोली भुयार) हे आपल्या शेतात काम करत असताना शेषेराव विठ्ठल जोमदे, राम शेषेराव जोमदे आणि लक्ष्मण शेषेराव जोमदे (सर्व रा. चिंचोली भुयार) यांनी त्यांना शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादींचा मुलगा सुनिल हा भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यालाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे बालाजी जोमदे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.