धाराशिव : धाराशिव शहरातील शिवनेरी नगरमध्ये राहणाऱ्या अतिक कासीम सास्तुरे यांच्या घरात बुधवारी दुपारी घरफोडी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या उघड्या दरवाज्यातून आत प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 78 हजार 999 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 22 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 ते 1.45 च्या दरम्यान घडली.
घरफोडीची माहिती मिळताच अतिक सास्तुरे यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम 331(3), 305(ए) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळंब येथे मोटरसायकल चोरी
कळंब : कळंब तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी धोंडीराम श्रीरंग पाटील यांची अंदाजे २०,००० रुपये किमतीची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता नानाभाउ लक्ष्मण उरपे यांच्या हॉटेल समोरून चोरीला गेली.
याप्रकरणी धोंडीराम पाटील यांनी दि. २२ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेली मोटरसायकल काळ्या रंगाची असून तिचा क्रमांक एमएच २५ वाय ३९८६ आहे. सध्या पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.