• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 30, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : अंगणवाडी सेविकेसह कनिष्ठ सहाय्यक लाच प्रकरणात गजाआड

admin by admin
October 18, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली
0
SHARES
4.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्तीसाठी लाच मागणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कनिष्ठ सहाय्यक या दोघींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. धाराशिव युनिटच्या ACB पथकाने शुक्रवारी यशस्वी सापळा रचून ही कारवाई केली.

तक्रारदाराने आपल्या पत्नीला अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्ती मिळावी यासाठी संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला होता. यासाठी श्रीमती मई बळीराम खांडेकर (वय ३४ वर्षे, कनिष्ठ सहाय्यक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, तुळजापूर) आणि श्रीमती सोनाली संदीप कदम (वय २८ वर्षे, अंगणवाडी सेविका, चिंचोली, तुळजापूर) यांनी १५,००० रुपयांची लाच मागितली. मात्र, तडजोडीनंतर १०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

तक्रारदाराने तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. ACB ने सापळा रचून पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघींनाही रंगेहाथ पकडले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. श्रीमती मई बळीराम खांडेकर, वय ३४ वर्षे, कनिष्ठ सहाय्यक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, तुळजापूर, धाराशिव.

२. श्रीमती सोनाली संदीप कदम, वय २८ वर्षे, अंगणवाडी सेविका, चिंचोली, तुळजापूर, धाराशिव.

यातील आलोसे क्रमांक 01 व आलोसे क्रमांक 02 यांनी यातील तक्रारदार यांचे पत्नीचे मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000 /- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन यातील आलोसे क्रमांक 01 यांनी पंचासमक्ष सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारली असता आलोसे क्रमांक 1) व आलोसे क्रमांक 2) याना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

अंगणवाडीतील लाचखोरी : निष्पाप बालकांच्या भविष्याशी खेळ !

पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी सापळा रचला असून पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांनी त्यांचे पर्यवेक्षण केले. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव @ दुरध्वनी क्रं. 02472-222879 @ टोल फ्रि क्रं. 1064

Previous Post

धाराशिवच्या राजकारणात ‘पाकिट पॉलिटिक्स’ आणि ‘बाईट बिझनेस’चा खेळ !

Next Post

अंगणवाडीतील लाचखोरी : निष्पाप बालकांच्या भविष्याशी खेळ !

Next Post
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

अंगणवाडीतील लाचखोरी : निष्पाप बालकांच्या भविष्याशी खेळ !

ताज्या बातम्या

एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटीची ‘सफाई’ मोहीम: कर्तव्यावर ‘टल्ली’ आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ‘नो मर्सी’ इशारा!

October 30, 2025
आमदार-पालकमंत्र्यांच्या वादात १४० कोटींची रस्ते कामे रखडली; धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा ‘रास्ता रोको’

आमदार-पालकमंत्र्यांच्या वादात १४० कोटींची रस्ते कामे रखडली; धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचा ‘रास्ता रोको’

October 30, 2025
एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करणे भोवले; तुळजापूरचे तत्कालीन सपोनि भालेराव यांना दोन हजार दंड

एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करणे भोवले; तुळजापूरचे तत्कालीन सपोनि भालेराव यांना दोन हजार दंड

October 30, 2025
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

सत्तेचा ‘अहंकार’ अन् धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’!

October 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : घाटशिळ रोडवर भरदिवसा व्यावसायिकाला लुटले; सोन्या-चांदीसह ३७ हजारांचा ऐवज लंपास

October 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group