परंडा :आरोपी नामे- 1) विठ्ठल लक्ष्मण महाजन, 2) दत्ता चांगदेव मोराळे, 3) भैरु भिमराव शिंदे, 4) संदीप विठ्ठल महाजन, 5) चंद्रकांत लक्ष्मण महाजन, 6) सुदर्शन चंद्रकांत महाजन सर्व रा. तांबेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 09.08.2023 रोजी 11.00 वा. सु. देवळाली शिवारातील शेत गट नं 564 मध्ये फिर्यादी नामे-औदुंबर लक्ष्मण महाजन, वय 43 वर्षे, रा. तांबेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांचे शेतातील पेरलेले पिक मोडून त्यावर ज्वारीचे पिक पेरुन नमुद आरोपींनी फिर्यादी हे अंपग आहे हे माहित असतानाही त्यांना लंगड्या असे हिनवून बोलून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- औदुंबर महाजन यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 323, 427, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. सह कलम 92 अपंग व्यक्ती अधिनियम सन 2016 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- 1)बशीर महम्मद पठाण, 2) शकील महमद पठाण, 3)साहेल शकील पठाण, 4) साजीत उर्फ बबल्या शकील पठाण, 5) फिरोज उमराव पटेल, 6) शैनाज बशीर पठाण सर्व रा. कुमाळवाडी, ता.जि. धाराशिव यांनी दि. 08.01.2024 रोजी 19.30 वा. सु. कुमाळवाडी येथे फिर्यादी नामे- कल्प्ना उमाकांत ढोणे, वय 35 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांचे गव्हाचे शेतातील पाणी बशीर पठाण यांचे शेतातील हरभऱ्याचे पिकात का आले या कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादी व फिर्यादीचे पती व मुलगा यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कल्पना ढोणे यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 452, 323, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे- 1)खुडु सुनिल कोकरे, 2) प्रभाकर शंकर देवगुडे, 3) सुरेश उर्फ भाई मस्के तिघे रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 17.00 वा. सु. काक्रंबा येथे अभिजीत मस्के यांचे टपरी जवळ रोडवर फिर्यादी नामे-सोपान गोविंद कोकरे, वय 30 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कोर्टात चालू असलेली शेताची केस मिटवून घेण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी माराहण केली. तसेच अण्णासाहेब माने हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी अण्णासाहेब माने यांचे डाव्या हाताचे अंगठ्यावर लहान चाकूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी व अण्णासाहेब माने यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सोपान कोकरे यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे- 1)सोहेल सैफन कुरणे, 2) जास्मीन सोहेल कुरणे दोघे रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.01.2024 रोजी 19.00 वा.सु. निलेगाव येथे फिर्यादी नामे- गौसीया सैफन कुरणे, वय 54 वर्षे, रा. निलेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव या नमुद आरोपी यांचे घराकडे गेल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने पायाच्या नडगीवर मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गौसीया कुरणे यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे- 1) सुनिल बिभीषन रणदिवे, 2) बिभीषन आत्माराम रणदिवे,3) विकास प्रकाश रणदिवे, 4)प्रकाश आत्माराम रणदिवे,5) सुभाष आत्माराम रणदिवे, 6) ऋषीकेश सुभाष रणदिवे सर्व रा. बोरगाव बु., ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 04.01.2024 रोजी 13.00 वा. सु. बोरगाव शेत शिवारातील शेत गट नं 132 मध्ये फिर्यादी नामे-शरद संदीपान रणदिवे, वय 48 वर्षे, रा. बोरगाव बु., ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे शेतातील खाजगी वहीवाटीतुन रस्ता करण्यासाठी नकार दिल्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, कुह्राडीची दांड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद रणदिवे यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- 1)रवि लक्ष्मण झिंगरुटे, रा. तुळजापूर नाका धाराशिव यांनी दि. 07.01.2024 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. सुर्यकांत पेट्रोलपंप छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे फिर्यादी नामे- अभिनव कैलाश शिंदे, वय 19 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना काही एक कारण नसताना शिवीगाळी करुन लाथाबुक्यांनी व डोक्यात चावीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिनव शिंदे यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.