तामलवाडी : आरोपी नामे-राम भिमराव मस्के व इतर 30 इसम सर्व रा. धोत्री, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 07.01.2024 रोजी रात्री 20.55 वा. सु. आबा दामु मस्के यांचे घरासमोरील रोडवर धोत्री येथे विनापास परवाना बेकायदेशी रित्या सार्वजनिक रोडवर दोन्ही बाजूस खड्डे करुन त्यावर महामानव डॉ. बाबासाहेब अंबेडकर प्रवेश द्वार या नावाची लोखंडी कमान बसवून सार्वजनिक मालमत्तेची विद्रुपन केले. तसेच दलीत व सर्व समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भिमराव लक्ष्मण वाघमारे,वय 57 वर्षे, व्यवसाय जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रभारी उप.अभियंता तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 153(अ) सह सार्वजनिक मालमत्ता विद्रुपन कायदा कलम 3 व मपोका कायदा कलम 102 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल
तुळजापूर : मयत नामे-रजिया खय्युम शेख, वय 40 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.01.2024 रोजी 23.00 ते दि. 02.01.2024 रोजी 08.00 वा. सु. आरोपी नामे-नागेश शिराळकर रा. वासुदेव गल्ली,तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- नागेश शिराळकर यांचे व मयत रजिया शेख यांचे मागील एक वर्षापासून असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती आरोपीचे पत्नी व आईस झाल्याचा व त्यावरुन आरोपीचे घरात भंडण तक्रारी सुरु झाल्याचा राग मनात धरुन नमुद आरोपीने दारु पिवून येवून मयत नामे रजिया शेख यांना शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने जाचास व त्रासास कंटाळून रजिया शेख यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- सलमान खय्युम शेख, वय 24 वर्षे, रा. वासुदेव गल्ली तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.