• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात ४२ बोगस डॉक्टर सापडले

admin by admin
November 6, 2023
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ४२ बोगस डॉक्टर सापडले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – आरोग्य विभागांतर्गत बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समितीची बैठक आज 6 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांचा तालुकानिहाय गोषवारा सादर करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये 90 व्यवसायीकांची नोंद झाली आहे. त्यापैकी तालुकाअंतर्गत विविध पोलिस स्टेशनमध्ये 26 व्यवसायीकांवर अनाधिकृत वैद्यकीय पोलिस तपास सुरु आहे.15 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.तसेच 42 व्यावसायिकांना यादीतून काढून टाकण्यात आले.यामध्ये व्यवसाय बंद केलेले, फरार, मयत आदींचा समावेश आहे.

तालुकास्तरीय ग्रामीण व शहरी पथकांनी प्राप्त तक्रारी व माहितीनुसार गुन्हे दाखल न झालेल्या उर्वरित सर्व व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करावेत व व्यवसाय बंद केलेले व्यवसायीकांनी पुन्हा व्यवसाय चालू केले किंवा नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.जर त्यांनी नंतर व्यवसाय चालू केला असेल तर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात यावी.असे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

जिल्ह्यात अनेक बोगस वैद्यकीय व्यवसायिक व्यवसाय करीत आहे,अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.अशा अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांवर प्रतिबंधात्मक कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे तालुकास्तरीय पथके गठित करण्यात आले आहे.

ग्रामीण स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी ( संबंधित तालुका ), गटविकास अधिकारी प्रतिनीधी (संबंधित तालुका), सहाय्यक पोलिस निरिक्षक/पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र).

शहरी भागात अतिरिक्त शल्यचिकित्सक हे धाराशिव शहराकरीता इतर सर्व तालुक्यासाठी वैद्यकीय अधीक्षक (संबंधित तालुका), मुख्याधिकारी नगर परिषद ( संबंधित तालुका),सहाय्यक पोलिस निरिक्षक / पोलिस उपनिरिक्षक (स्थानिक पोलिस स्टेशन संबंधित तालुका कार्यक्षेत्र).

तालुका स्तरीय गठीत पथकास सन 2022-23 या वर्षात अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायीकांवर कारवाईसाठी मान्यता देण्यात आली. तालुकास्तरावर पथकाने कार्यवाही करताना संबंधित व्यवसायीकाची माहिती घेण्यात यावी.या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी उपस्थितांचे स्वागत करुन बैठकीस सुरुवात केली.

बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावना केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सह संचालक कुष्ठरोग डॉ.मारुती कोरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड आणि सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तालुका सर्व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव येथे होणार 2023-24 चा जिल्हास्तर युवा महोत्सव

Next Post

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन लेखापालाची मुजोरी

Next Post
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन लेखापालाची मुजोरी

धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील दोन लेखापालाची मुजोरी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!

August 12, 2026
पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार

August 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!

August 12, 2026
खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक

August 11, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

August 12, 2026

Recent Posts

  • परदेशातून ‘मल्हार पर्वा’ची एन्ट्री अन् वस्तादाने थेट ‘शिकाऊ पैलवाना’ला आस्मान दाखवले!
  • पवनचक्की कंपनीच्या मनमानीविरोधात शेतकऱ्यांची तक्रार
  • झेडपीत ‘हायव्होल्टेज ड्रामा’! माऊलींच्या आदेशाने सत्ताधाऱ्यांची दांडी, सीईओंचा पळ आणि राष्ट्रगीताचा भयंकर अवमान!
  • खताच्या असमान वितरणावर कृषी विभागाची बैठक; लिंकिंगविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
  • वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!