आंबी : आरोपी नामे-1)अशोक बाळु पवार, 2) पिंका बाळु पवार, 3) पुष्पा बाळु पवार, 4) अकाश बाळु पवार, सर्व रा. बाळगव्हाण ता. जामखेड जि. अहमदनगर, 5) सर्वेश गोवर्धन काळे,6)शहाबाई सर्वेश काळे, दोघे रा. चिंचपुर बु. ता. परंडा, 7) मदीर उर्फ सुधीर सभापती काळे, रा. झरा ता. करमाळा जि. सोलापूर यांनी दि.26.04.2024 रोजी 10.30 ते 11.00 वा. सु. तिंत्रज येथे फिर्यादी नामे- ज्योती अशोक भोसले, वय 35 वर्षे, रा. तित्रंज ता. भुम जि. धाराशिव यांचे दिर नामे- सतीश नवनाथ भोसले, वय 33 वर्षे, यांना नमुद आरोपींनी हलगटाचे देवकार्य करायचे असल्या कारणाने पैशाची अडचणअसल्यामुळे तुझी मुलगी साक्षी सतीश भोसले, वय 9 वर्षे ही आम्हाला घेवून जायची आहे या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन तलवारीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ज्योती भोसले यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 307,324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506, भा.दं.वि.सं. सह भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1)विशाल प्रताप, 2) आदित्य भंडारे, 3) अभिषेक मुळे सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 20.45 वा. सु. डुल्या मारुती जवळ तुळजापूर येथे फिर्यादी नामे- हर्षद लक्ष्मण मोटे, वय 20 वर्षे, रा. कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने उजव्या हाताच्या पंजावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हर्षद मोटे यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 325, 323, 34, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :आरोपी नामे-1)सुंदर शंकर शिंदे, 2) आशाबाई सुंदर शिंदे, रा. दस्मेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 16.00 वा. सु. गोजवाडा शिवारातील शेताजवळ फिर्यादी नामे- रत्नमाला राजेंद्र काळे, वय 35 वर्षे, रा. कासारखणी पारधी वस्ती वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची मुलगी नामे- गौरी राजेंद्र काळे हीस नमुद आरोपीने उसाच शेतात शेळ्या गेल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडाने मारहाण करुन केली. तसेच फिर्यादी या भांडण सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही नमुद आरोपींने तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण करुन दात पाडून जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रत्नमाला काळे यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे 325, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)आशीष गायकवाड व इतर दोन इसम यांनी दि.30.04.2024 रोजी 18.00 वा. सु. एनएच 65 रोडवर दाबका शिवार येथे फिर्यादी नामे- शंकर नामदेव चव्हाण, वय 37 वर्षे, रा. हडपसर पुणे ता. हवेली जि. पुणे यांना व त्यांची सासु व मेहुणा यांना नमुद आरोपींनी गाडी समोर गाडी लावल्याने ते विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बेल्ट व दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर चव्हाण यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1)आकाश शिंदे, 2) नवाज शेख, 3) युनुस शेख, 4) शानुर शेख रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 17.00 वा. सु. परंडा कुर्डूवाडी रोड लगत असलेल्या ए.के लाईट डेकोरेशन समोर परंडा येथे फिर्यादी नामे-विश्वास दत्तात्रय बनसोडे, वय 32 वर्षे, रा. समता नगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वास बनसोडे यांनी दि.01.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 504, 34, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.