वाशी : अनैतिक संबंधातून एका 34 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुस्ताकीन जब्बार शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताकीन शेख हे 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.30 ते 11.30 या वेळेत राष्ट्रीय महामार्ग 52 वर घुलेमाळ येथे वाशी शिवारात होते. त्याचवेळी आरोपी सरदार शेख, अकबर शेख आणि इतर दोन जणांनी त्यांच्यावर अज्ञात हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात मुस्ताकीन शेख यांचा मृत्यू झाला.
मुस्ताकीन शेख यांचे वडील जब्बार चॉद शेख (वय 55 वर्षे, रा. साळेगाव ता. केज जि. बीड) यांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी भा. न्या. सं. कलम 302, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धाराशिव: अपघाताचा बनाव करून खून करणाऱ्या आरोपींना अटक
धाराशिव: येथील स्थानिक गुन्हे शाखेने एका खुनाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी अपघात झाला आहे, असा बनाव करून खून लपवण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कासार आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घुलेचा मळा शिवारात सोलापूर-बीड महामार्गावर एक व्यक्ती मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता त्यांना घातपात झाला असल्याचा संशय आला.
मृतक मुस्तकीन जब्बार शेख (रा. साळेगाव) असल्याची ओळख पटली. नातेवाईकांकडे चौकशी केली असता मुस्तकीनचे काही दिवसांपूर्वी अकबर नावाच्या व्यक्तीशी भांडण झाले होते. या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयित आरोपी अकबर सरदार शेख याचे नाव समोर आले. वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे गेले. या पथकाने अकबरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भाऊ, वडील आणि मेहुण्याच्या मदतीने मुस्तकीनला मारल्याची कबुली दिली. मुस्तकीनचे त्याच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी हा खून केल्याचे आरोपींनी सांगितले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
भाऊ अमर शेख, वडील सरदार शेख आणि दाजी फारुख शेख सर्व रा. पिंपळनेर, ता. जि. बीड यांचे मदतीने यातील मयत याने त्यांचे बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन वाशी शिवारात नेवून मारुन टाकले असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने तात्काळ नमुद4 आरोपी वयांनी गुन्ह्यात वापरलेले 2 मोटार सायकल ताब्यात घेवून त्यांना पुढील कारवाईकामी पोस्टे वाशी येथे हजर केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदर्शन कासार, सहायक फौजदार वलीउल्ला काझी, पोलीस हवालदार शौकत पठाण, फहरान पठाण, जावेद काझी, चालक पोलीस अंमलदार रत्नदीप डोंगरे, नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.