धाराशिव : मयत नामे-1) सौरभ सुभाष सदनी, रा. हातकनंगले, जि कोल्हापुर, 2) विजय बबन जाधव रा. बेडक रा. मिरज, हे तिघे दि.15.02.2024 रोजी 17.30 वा. सु. तुळजापूर ते धाराशिव जाणारे रोडवर गोकर्णा पेट्रोल पंप जवळून अशोक लिलॅड दोस्त क्र एमएच 09 जीजे 2716 मधून जात होते. दरम्यान ट्रक क्र आरजे 01 जीसी 2366 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा हायगीयीने व निष्काळजीपणे रोडचे परिस्थीकडे दुर्लक्ष करुन अविचाराने कुठल्याही प्रकारचे फिलेक्टर व इंडीकेटर न लावता धोकादायक स्थितीत हायवेवर उभा केल्यामुळे अशोक लिलॅड दोस्त हा ट्रकला पाठीमागून जावून धडकून अपघात झाला. या अपघातात सौरभ सदनी व विजय जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आमीत विठ्ठल जाधव रा. बेडक ता. मिरज जि. सांगली हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुभाष सदाशिव सदनी, वय 48 वर्षे, रा. मजले ता. हातकनंगले जि. कोल्हापूर यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ)(ब), 122/177 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : मयत नामे-1)रवि दत्तात्रय नलवडे, वय 25 वर्षे, व सोबत जखमी नामे- 2) ऋषीकेश सुर्यकांत नलवडे, वय 22 वर्षे रा. वारेवडगाव, ता. भुम जि. धाराशिव हे दोघे दि. 19.02.2024 रोजी 00.30 वा. सु. भुम ते पाथरुड रोडवरील उळूप येथील सोनारी दुध डेअरी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 3562 वरुन जात होते. दरम्यान क्रुझर क्र एमएच 13 बीएन 4369 चा चालकाने त्याचे ताब्यातील क्रुझर ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रवि नलवडे व ऋषीकेश नलवडे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात रवि नलवडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर ऋषीकेश नलवडे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय पांडुरंग नलवडे, वय 33 वर्षे, रा. वारेवडगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
नळदुर्ग : आरोपी नामे-1) मारुती भिमराव सावंत, वय 25 वर्षे, रा. येडोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव, हे दि.20.01.2024 रोजी 19.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एए 9861हॉटेल सितारा नळदुर्ग समोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : आरोपी नामे-1) गणेश विष्णु लोंढे, वय 25 वर्षे, रा. मातंग नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.01.2024 रोजी 21.34 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 0725 ही आठवडी बाजार रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : आरोपी नामे-1) सुरज प्रकाश कटारे, वय 25 वर्षे, रा. मळवटी गाव लातुर ता.जि. धाराशिव हे दि.20.01.2024 रोजी 12.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 यु 6191 ही पेट्रोलपंप ढोकी येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
ढोकी :आरोपी नामे-1)फारुक मुसा सय्यद, वय 35 वर्षे रा. ढोकी ता. जि.धाराशिव, 2) सुरज सतीश चौधरी, वय 19 वर्षे, रा. पिंपळवाडी ता. बार्शी जि. सोलापूर, 3) नाना राजेंद्र कोकरे,, वय 18 वर्षे, रा. पेठ तेर ता. जि. धाराशिव, 4) गणेश कमलाकर नवगिरे, वय 24 वर्षे, रा. वाटवडा ता. कळंब जि. धाराशिव, 5) विक्रम विश्वनाथ चव्हाण, वय 40 वर्षे, रा. म्होतरवाडी ता.जि. धाराशिव हे सर्वजन दि.20.02.2024 रोजी 11.15 ते 16.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 07 बी 9902, ट्रॅक्टर क्र एमएच 13 डीएम 8605, मोटरसायकल क्र एमएच 13 डब्ल्यु 2868, मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 3461, मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 4426 हे ढोकी पेट्रोलपंप चौक येथे व संत गोरोबा काका मंदीर समोरील रोडवर वेगवेगळ्या दोन ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना ढोकी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.