ढोकी : फिर्यादी नामे- स्वप्निल शहाजी ढेकणे, वय 26 वर्षे, रा. पेठ तेर ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.02.2024 रोजी 21.00 ते दि. 19.02.2024 रोजी 6.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील सॅनसुई कंपनीची 32 इंची एलईडी टिव्ही, चांदीचे दागिने व रोख रक्कम 25,000₹ असा एकुण 55,600 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- स्वप्निल ढेकणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे- धर्मराज बळीराम भातलवंडे, वय 66 वर्षे, रा. शेलगाव दिवाणे ता. कळंब जि. धाराशिव यांचे शेत गट नं 38/39 मधुन महिंद्रा सस्टेन प्रा. लि. मोड्युल 335 डब्ल्यु पी असे एकुण 9 सोलार प्लेट अंदाजे 30,000₹ किंमतीच्या ह्या दि. 02.02.2024 रोजी 18.00 ते दि. 03.02.2024 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धर्मराज भतलवंडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे- शरद लक्ष्मण खराडे, वय 43 वर्षे, व्यवसाय इनरीच एनर्जी प्रा. लि. सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेतातील कॉपर केबल वायरचे एकुण 18 केबल ड्रम अंदाजे 3,60,000 ₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने दि. 18.02.2024 रोजी 01.30 ते 02.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद खराडे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.