धाराशिव : फिर्यादी नामे-कैलास शंकर चव्हाण, वय 43 वर्षे, रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- ज्ञानेश्वर शंकर चव्हाण, वय 16 वर्षे रा. जवळ नि. ता. परंडा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.20.02.2024 रोजी 12.30 वा. सु. शासकिय तंत्रनिकेतन कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास चव्हाण यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आठवड्यात दुसरी घटना
मुरुम : फिर्यादी नामे-संगिता विजय राठोड, वय 40 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- विशाल विजय राठोड, वय 15 वर्षे रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.19.02.2024 रोजी 10.00 वा. सु. आष्टाकासार येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगिता राठोड यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
भुम : मयत नामे- बापु रावसाहेब कांबळे, वय 65 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.21.02.2024 रोजी 06.00 वा. पुर्वी राहाते घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-1) बाबा नाना कांबळे, 2) नाना ईश्वर कांबळे(पाटील), 3) संगीता ढवळे, 4) महादु नायकिंदे, 5) संतु आरसुळे रा. पाटसांगवी , 6) अन्नपुर्णाबाई यांनी मयत बापू कांबळे व्याजाचे पैशाचे कारणावरुन मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपींच्या जाचास व त्रासास कंटाळून बापू कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे-अविनाश बापु कांबळे, वय 31 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव, ह.मु. मोरीया हाउसिंग सोसायटी मोरे वस्ती चिखली पुणे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नुकसान करणे
परंडा : फिर्यादी नामे- दिनकर संभाजी सुरवसे, वय 51 वर्षे रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांचे भोत्रा शिवारातील शेत गट नं 01 मधील उसाचे पिकाला आरोपी नामे- 1)लक्ष्मण बळीराम शेलार, 2)आवडाबाई लक्ष्मण शेलार, 3) आनंद नंदेश्वर शेलार, सर्व रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 20.02.2024 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. आग लावूनअंदाजे एक एकर उसाचे पाईपचे 9 नळ्या, एक टी व एक कॉक असे एकुण 54,000₹ किंमतीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांनी नमुद आरोपींना तुम्ही असे का केले असे विचारले असता नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनकर सुरवसे यांनी दि.21.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 435, 427,, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.