धाराशिव: शहरातील ३१ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीला तिस एअरलिडर बनविण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी २० ऑगस्ट २०२३ ते २९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घरी एकटी असताना आरोपीने तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच, याबाबत कुणाला काही सांगितल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. अखेर पीडित तरुणीने ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ६४, ३५२, ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.